पवारांनी दिलेल्या 'चाव्या' शिवसेनेनंं घेतल्या परत; महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता

महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

  • Share this:
मुंबई, 22 जून : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात सूर लावताना दिसत आहेत. काँग्रेसनं (Congress) काही दिवसांआधी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तर आता राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी  (Tata cancer Hospital)  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कॅन्सर रुग्णांच्या (Cancer patients) नातेवाईकांना खोल्या दिलासा होत्या. मात्र याला शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केला आहे. त्यामळे जितेंद्र आव्हाड चांगलेच नाराज आहेत अशी माहिती मिळाली आहे. म्हणून महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय करण्यासाठी म्हाडाकडून (MHADA) घरं उपलब्ध करुन देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाडांनी केली होती. हे आश्वास पवारांच्या लक्षात होतं. भेटीदरम्यान त्यांच्यात आणि पवारांमध्ये याबाबत चर्चाही झाली होती. घरं  तयार आहेत, चाव्याही तयार आहेत. यावर प्रत्युत्तर देताना मग उशीर कशाला? असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते. घराच्या चाव्या देण्याबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली होती. त्यानुसार काही दिवसांआधी शरद पवार यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण विभागानं मोकळ्या खोल्यांच्या चाव्यांचं वाटपही केलं होतं. मात्र आता शिवसेनेच्या आमदारानं यावर आक्षेप घेतल्यामुळे यावर स्टे आला आहे. यावरून आव्हाड नाराज आहेत अशी माहिती मिळतेय. महाविकास आघडीतील तीनही पक्षांत वाद? अशातच आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्मण झाले आहेत शी माहिती मिळतेय. तसंच समन्वय समितीतील तीनही पक्षांच्या नेत्यांनी एक एकमेकांवर नाराजी व्यक्त केली. अजित पवार (DCM Ajit Pawar), नाना पटोले (Nana Patole) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीत नेत्यांची एकमेकांवर नाराजी आहे. तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते नाराज आहेत. वारंवार एकमेकांच्या विरोधात विधाने करून महाविकास आघाडी प्रतिमा मलीन करू नका अशा कानपिचक्या ही काही नेत्यांनी दिल्या आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Published by:Atharva Mahankal
First published: