मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बोगस मतदानाचा संशय, जालन्यात मतदान केंद्रावर राडा; शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

बोगस मतदानाचा संशय, जालन्यात मतदान केंद्रावर राडा; शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात सुरु असलेल्या नगरपंचायत निडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन गटात तुफान राडा पाहायला मिळाला.

जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात सुरु असलेल्या नगरपंचायत निडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन गटात तुफान राडा पाहायला मिळाला.

जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात सुरु असलेल्या नगरपंचायत निडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन गटात तुफान राडा पाहायला मिळाला.

  • Published by:  Chetan Patil

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 21 डिसेंबर : राज्यभरात आज ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा (Local Body Elections) कार्यक्रम पार पडत आहे. राज्यात आज 105 नगर पंचायतींसाठी (Nagar Panchayat Election) मतदान पार पडत आहे. तसेच सांगली मिरज कुपवाडा, अहमदनगर, धुळे महापालिकेत पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. याशिवाय काही ठिकाणी जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. या दरम्यान जालना (Jalna) जिल्ह्यातून एक वाईट आणि अनपेक्षित घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर (Badnapur) शहरात मतदान केंद्रावर दोन गटात तुफान हाणामारी (Clash between two groups) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. संबंधित परिसरात आता पोलिसांनी फौजफाटा वाढवला आहे.

नेमकं प्रकरण काय घडलं?

जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात सुरु असलेल्या नगरपंचायत निडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन गटात तुफान राडा पाहायला मिळाला. वार्ड क्रमांक 12 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोपावरुन शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. याच बाचाबाचीचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झालं. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थीती नियंत्रणात आणली. दरम्यान या घटनेनंतर मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढिण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात वार्ड क्रमांक 12 मध्ये संबंधित प्रकार घडला. संबंधित मतदान केंद्रावर सकाळपासून नागरिकांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर पोलिसांचा देखील चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तरीही तिथे जी गोष्ट घडायला नको होती ती घटना अखेर तिथे घडली. दोन गटामंमध्ये सुरुवातीला तुफान बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रुपांतर थेट हाणामारीत झालं.

हेही वाचा : 'वाह रे MVA तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल', देवेंद्र फडणवीसांची चौफेर टीका

संबंधित हाणामारी सुरु असताना मतदान केंद्रावर असलेल्या पोलिसांना या घटनेची चाहूल लागली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मध्यस्थीने मोठा वाद निस्तारला. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांना या घटेनची माहिती दिली. या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आणखी मोठी कुमक घटनास्थळी रवाना झाली. तिथे पोलिसांचा आता चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. घटना घडली त्यावेळी परिसरातील तणावाचे वातावरण होते. पण आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने शांतता आहे. नागरिकांचा अद्यापही मतदानासाठी ओघ सुरुच आहे.

First published: