अमरावती, 5 ऑक्टोबर : अमरावती जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे निकाल (Amravati district central co operative bank election result) हाती आले. या निवडणुकीत सहकार पॅनलने (Sahakar panel) बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवला. तर बच्चू कडू यांच्या पॅनलचा पराभव झाला. या निवडणुकीच्या निकालानंतर जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्जही केला.
दुपारी 2 वाजताच्या सुमारास सहकार पॅनलचे काही कार्यकर्ते आंदोस्तव साजरा करीत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. या कारणावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांत वाद सुरू झाला. हाच वाद सुरू असताना बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व सहकार पँनलचे प्रमुख यांचा एका व्यक्तीने अभिनंदन केले. त्याचवेळेस त्यांचा खिसा कापण्याचा प्रयत्न झाला आणि कार्यकर्त्यांनी त्या खिसेकापूला पकडून मारहाण सुरू केली. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगविण्याकरिता सौम्य लाठीचार्ज केला यात बबलू देशमुख यांच्यासह त्यांच्या पुतण्यालाही लाठीचार्जचा सामना करावा लागला.
यानंतर पोलिसांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असता संतप्त झालेल्या इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेराव घातला. यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचे निकाल आज हाती आलेले आहेत. या निकालात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख (Babalu Deshmukh) यांच्या सहकार पॅनलने बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयासोबतच बँकेवर आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सातशे कोटी गुंतवणूक प्रकरणी सव्वातीन कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच देखील परिवर्तन पॅनल ने सातत्याने प्रचार केला होता.
सहकार पॅनलला निवडणुकीत 13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजुन स्थापन व्ह्ययची आहे. राजकारणात कधीही गुणाकार बेरीज होऊ शकते. बँकेत पुढच्या काळात गैव्यवहार होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ असे देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सागिलते आहे.
हे पण वाचा : अमरावती जिल्हा बँक निवडणूक: अटीतटीच्या लढतीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मारली बाजी, तीन मतांनी विजय
असा आहे निवडणुकीचा निकाल - एकूण जागा 21
सहकार पॅनल - 13
परिवर्तन पॅनल - 5
अपक्ष - 3
सहकार पॅनलचे विजयी उमेदवार
चांदुर रेल्वे -वीरेंद्र जगताप
धामणगाव -श्रीकांत गावंडे
अमरावती -सुनील वऱ्हाडे
भातकुली -हरिभाऊ मोहोड
चिखलदरा -दयाराम काळे
दर्यापूर -सुधाकर भारसाकळे
तिवसा -सुरेश साबळे
बबलूभाऊ देशमुख ओबीसी मतदार संघ
बळवंत वानखडे - अनुसूचित जाती
पुरुषोत्तम अलोणे - विमुक्त जाती
प्रकाश काळबांडे - सहकारी पत संस्था
सुरेखा ठाकरे - महिला राखीव
मोनिका मर्डिकर - महिला राखीव
परिवर्तन पॅनल
राज्यमंत्री बच्चू कडू -चांदूरबाजार
जयप्रकाश पटेल -धारणी सेवा सह
रवींद्र गायगोले - व्यक्तिगत मतदार संघ
चित्रा डहाणे -मोर्शी सेवा सहकारी संघ
अजय मेहकरे अंजनगाव सेवा सहकारी
अपक्ष विजयी उमेदवार
अभिजीत ढेपे - नांदगाव खडेश्वर
नरेशचंद्र ठाकरे - वरूड
आनंद काळे - अचलपूर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Yashomati thakur, काँग्रेस