मुंबई, 9 ऑगस्ट: बॉलिबूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियान आत्महत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. दिशा सॅलियान हिनं केलेल्या शेवटच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दिशाचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला आहे. दिशाचा मृतदेह विवस्त्र सापडला होता, असं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आता आणखी वाढला आहे. दियाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टबाबत मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा...सुशांत प्रकरणात नेमके काय चुकले? संजय राऊतांनी पोलीस तपासावर ठेवले बोट!
दिशा सॅलियनचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला होता, हे वृत्त मुंबई पोलिसांनी फेटाळलं आहे. यात कुठलेही तथ्य नसल्याचं विभागीय पोलिस आयुक्त विशाल ठाकू यांनी स्पष्ट केलं आहे. घटनेनंतर पोलिस तातडीनं घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी दिशा सॅलियानच्या मृतदेहाचा पंचनामा केले तेव्हा तिचे आई-वडील उपस्थित होते, असंही विशाल ठाकूर यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे, दिशा सॅलियान आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिची मैत्रिण अंकिताचा जबाब नोंदवला आहे. अंकिता ही लंडन येथे राहते. दिशानं आत्महत्या केली त्या रात्री तिनं अंकिताशी संवाद साधला होता. एवढंच नाही तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दिशानं अंकितासोबत आपल्या अडचणी शेअर केल्या होत्या.
This is to clarify that the reports of Disha Salian's body being found naked is false. After the incident, Police immediately reached the spot and did 'panchnama' of the body. Her parents were at the spot: Vishal Thakur, DCP Zone-11. #Mumbai
— ANI (@ANI) August 9, 2020
दरम्यान, दिशाच्या आत्महत्येच्या एका तासापूर्वीचा VIDEO आता समोर आला आहे. हा एका पार्टीचा व्हिडिओ असून त्यात दिशा दिशा आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 8 जूनला ही पार्टी झाली होती. या पार्टीनंतर दिशाने आत्महत्या केली होती.
आत्महत्येच्या एक तास आधीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिशा आणि तिचे मित्र काश्मिर सिनेमातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे. दिशाही मनमुरादपणे डान्स करत आहे. दिशानेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअॅपवर शेअर केला होता.