मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आमचे कान नक्की टोचा, पण उद्या...', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे थेट मागणी

'आमचे कान नक्की टोचा, पण उद्या...', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे थेट मागणी

'समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येत आहे. आता उद्या राज्यपालांच्या विधानावर पांघरून घालण्याचे काम केले जाईल.

'समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येत आहे. आता उद्या राज्यपालांच्या विधानावर पांघरून घालण्याचे काम केले जाईल.

'समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येत आहे. आता उद्या राज्यपालांच्या विधानावर पांघरून घालण्याचे काम केले जाईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  sachin Salve

जालना, 10 डिसेंबर : 'समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जो वाद पेटला आहे. महाराष्ट्र व्याप्त जमीन आहे, त्याबद्दल सडकून बोललं पाहिजे. कर्नाटकच्या भूमिकेवर तुम्ही बोललं पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली.

जालन्यात मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

'समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येत आहे. आता उद्या राज्यपालांच्या विधानावर पांघरून घालण्याचे काम केले जाईल. कसे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते. मग आम्हाला टोमणे मारतील. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे, त्यावर ते बोलतील. माझी विनंती तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही देशाचे पालक आहात. हे रेडे वेद बिद काही बोलणार नाही, ते फक्त खोका खोका बोलतील. जरूर आमचे कान टोचावे, तुमचे अधिकार आहे. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जो वाद पेटला आहे. महाराष्ट्र व्याप्त जमीन आहे, त्याबद्दल सडकून बोललं पाहिजे. कर्नाटकच्या भूमिकेवर तुम्ही बोललं पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली.

(धनंजय मुंडेंनी डोक्याला लावला हात, पैसे मागण्याच्या फोनमुळे पोलिसांकडे घेतली धाव)

समृद्धी महामार्ग झाला तो चांगला झाला आहे. हे रास्त होत राहतील. पण जर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये अडकलेला असेल. शिवसेनेची मागणी नेहमी राहिली आहे. शेवटी बेळगावमधील मराठी माणसावर जो अत्याचार होतोय. मराठी बांधवावर अत्याचार होत आहे, त्यांना न्याय कधी देणार आहे. आपण कधी कानडी भाषेवर बोललो नाही. पण कोणीही यावं आणि सोलापूर मागावं, उद्या आमच्या पंढरपूरचा विठ्ठलावर हक्क सांगाल. मला अपेक्षा आहे, पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र आणि कर्नाटक वादावर भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.

'साहित्य संमेलनाला मी पहिल्यांदा आलोय. साहित्यिक हा सुद्धा एक माणूस असतो. शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडनं हे महत्वाचं. शेतकऱ्यांच्या भावनांना वाचा कुणी फोडायची. प्रतिभावान माणसं आहेत ही सगळी मराठवाडा ही संतांची, शौर्याची भूमी आहे. जो वाचणारचं नाही तर वाचेल कोण. महाराष्ट्राच्या शिकवणीवर देश चालला आहे. बाहेरून आलेल्यांचं खपवून घेणार नाही. जर कुणी अपमान केला तर त्याला खडसावून जाब विचारू. राजा जर चुकत असेल तर आणिती चूक त्याला कुणी सांगत नसेल तर ते राज्याचं नुकसान आहे. राजकारणी चुकत असतील तर साहित्यिकांनी खडसावं, असंही ठाकरे म्हणाले.

(कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उघडपणे दिला इशारा, शिंदे गटाचे मंत्री म्हणाले...)

'हिटलर छळून छळून मारतो. मतांची किंमत खोक्यांमध्ये नाही तर भावनांमध्ये आहे. तुम्ही दिलेलं मत तुम्हाला कळतंय का कुठं जाणार आहे. एकदा जाहीर करा देशातली लोकशाही संपली. आपल्या देशात लोकशाही खरच रुजलीये का? तेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं होतं आज लोकशाही टिकवायचं आहे, देशाचे कायदेमंत्री न्यायमूर्तींवर बोट दाखवताय. पंतप्रधान जर न्यायमूर्ती नेमण्याचं काम करत असाल तर न्यायालय रद्द करा. जीवघेणी लोकशाहीत अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

'चर्चा करून काय होणार नाही तर रस्त्यावर उतरलं पाहिजे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी भीकच मागावी, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

First published: