सुधीर मुनगंटीवारांचा संजय निरुपमांना दणका!

सुधीर मुनगंटीवारांचा संजय निरुपमांना दणका!

यवतमाळ जिल्ह्यात “अवनी’ वाघिणीला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार करण्यात आले.

  • Share this:

महेश तिवारी, प्रतिनिधी

14 डिसेंबर : अवनी’ वाघीण प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा आरोप करणारे काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्याविरोधात राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात “अवनी’ वाघिणीला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केलं होतं.

अनेकांनी या प्रकरणात त्यांच्यावर आरोप केलं. तसंच संजय निरूपम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी वनमंत्री म्हणून मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात झालेल्या वाघांच्या मृत्यूची यादीच दिली.

याशिवाय आंतरराष्ट्रीय तस्करांसोबत त्यांचे सबंध असल्याचा खळबळजनक आरोपही केला. त्याचवेळी मुनगंटीवार यांनी निरूपम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असं सांगितलं.

दरम्यान, आज मुनगंटीवार यांनी चंद्रपूर न्यायालयात त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल असून, याअंतर्गत दंड आणि शिक्षेची तरतूद आहे.

======================

First published: December 14, 2018, 7:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading