काँग्रेसची शिवसेनेला थेट धमकी, राज्यसभेत शिवसेना बदलणार भूमिका?

काँग्रेसची शिवसेनेला थेट धमकी, राज्यसभेत शिवसेना बदलणार भूमिका?

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेना आणि जेडी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास (प्रतिनिधी) नवी दिल्ली, 11 डिसेंबर: लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला बहुमत मिळाल्यानंतर आता बुधवारी दुपारच्या सत्रात हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत मांडणार आहेत. राज्यसभेत मोदी सरकारची हे विधेयक मंजूर करून घेताना मोठी कसोटी लागणार आहे. लोकसभेत मोदी सरकारला पाठिंबा दिलेले शिवसेना आणि जेडी पक्ष राज्यसभेत पाठिंबा देणार का ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली आहेत. शिवसेनेने लोकसभेत मात्र विधेयकाचं समर्थन केलं. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींसह वरिष्ठ काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेनं आपला निर्णय मागे घेतला नाही तर महाराष्ट्रील सत्ता स्थापनेचा पाठिंबा काढून घेऊ अशी धमकीही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतील पाठिंबा काढून घेतला तर ठाकरे सरकार पडू शकतं या भीतीपोटी शिवसेना आपल्यापासून घुमजाव करणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूनं मत दिल्यानंतर सोनिया गांधी आणि काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते शिवसेनेवर नाराज आहेत. त्यामुळे कुठेतरी काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेना माघार घेणार का? अशीही एक चर्चा सुरू झाली आहे. सेनेच्या भूमिकेवरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत. त्यामुळे शिवसेना पुरती कात्रीत अडकल्याचं पाहायला मिळत आहे. या विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ होण्याची चिन्ह आहेत. या विधेयकाविरोधात काँग्रेसकडून बुधवारी देशभरात आंदोलनं करण्यात येणार आहेत.

देशहित डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहोत. त्यामुळे या विधेयकात अधिक स्पष्टता येणं गरजेचं आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांना आणि विधेयकाच्या बाजूनं असणाऱ्या दोघांनाही नेमकं विधेयक कशा पद्धतीचं असणार आहे हे स्पष्ट झालं आहे का हे पाहाणं गरजेचं आहे. त्यामुळे अमित शाहांनी हा भ्रम दूर केला तर शिवसेना पाठिंबा देईल अन्यथा संभ्रम राहिल्यास पाठिंबा दिला जाणार नाही. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. लोकसभेत जरी नागरिकत्व सुधारणा विधेयक जरी लोकसभेत मंजूर झालं असेल तरीही राज्यसभेत भाजपची वाट बिकट आहे.

वाचा-भाजप आणि शिवसेना एकत्र येतील, शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ

राज्यसभेत भाजपचे 83 खासदार आहेत. तर जनता दलाचे 6 खासदार आहेत. बिहारमध्ये नितिश कुमारांची सत्ता आहे. त्यांच्या पक्षाने या विधेयकाला लोकसभेत समर्थन दिलं आहे. त्याशिवाय शिरोमणी अकाली दलाचे तीन, आरपीआय एक आणि इतर पक्षांचे 13 खासदार आहेत. या सर्वांचे मिळून एनडीएकडे 106 इतके संख्याबळ आहे. जदयुने जरी लोकसभेत समर्थन दिलं असलं तरी याबाबत पक्षात मतभेद आहेत.

आघाडी, युतीत नसलेले पक्ष कोणाच्या बाजूने?

काही पक्ष असे आहेत ज्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. मात्र, विचारसऱणीच्या आधारे संबंधित पक्ष त्यांची बाजू वेळोवेळी घेत असतात. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा मोठा वाटा आहे. त्यांचे 13 राज्यसभा खासदार आहेत.दुसरेकडी समाजवादी पार्टीचे 9, टीआरएसचे 6, सीपीएमचे 5, बसपाचे 4, आपचे 3 खासदार आहेत. त्याशिवाय पीडीपीचे 2, सीपीआय, जनता दल सेक्युलर, जेडीएसचे प्रत्येकी एक खासदार राज्यसभेत आहेत. हे सर्व मिळून 44 खासदार होतात. यातील जवळपास सर्व पक्षांचा नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध होण्याची शक्यता आहे.

इतर 12 सदस्य

राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त 12 सदस्य आहेत. यापैकी 8 सदस्यांनी भाजपप्रवेश केला आहे तर उरलेल्या चार पैकी तीन सदस्य एनडीएच्या बाजूने तर एक युपीएच्या बाजूने मत देण्याची शक्यता आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 08:46 AM IST

ताज्या बातम्या