किरीट सोमय्या बिचारा माणूस, जितेंद्र आव्हाडांचा सणसणीत टोला

किरीट सोमय्या बिचारा माणूस, जितेंद्र आव्हाडांचा सणसणीत टोला

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून महाविकासआघाडीवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : सत्ता गेल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये  शाब्दिक युद्ध सुरूच आहे. आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून महाविकासआघाडीवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्या हा बिचारा माणूस आहे. भाजपने खासदारकीचं तिकीट पण कापलं, त्यामुळे होतं नव्हतं ते  कामपण गेलं. त्यांना सध्या काहीच काम नाही. थोडफार ते काम करत आहे, तर करू द्या, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला.

देशात हिंदू मुस्लिम वाद कसा पेटवायचा हे भाजपवाल्यांचं प्रमुख काम आहे. कांदा-टोमॅटोचा भाव किती आहे. शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या, किती जणांच्या नोकऱ्या गेल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय झालं.  याबद्दल ते काही बोलतं नाही. त्यामुळे किरीट सोमय्यांसारख्या माणसांना काम करू द्या, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.

किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.  यात त्यांनी मुंबईतील शिवाजी नगर, गोवंडी, चांदिवली ठाणेतील मिरा रोड, भायंदर, नवी मुंबई इथं मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत. आता नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केला आहे, त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, घुसखोरांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.

नवाब मलिक यांनी राम कदमांना फटकारलं

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरवर राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये राडा सुरूच आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी आगामी अधिवेशनावरून सरकारवर ट्वीट करून टीका केली. त्यांच्या या टीकेला उत्तर देत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार टोला लगावला.

'कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था राम कदम यांची झालेली दिसते, अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

तसंच आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न (LAQ) ३० दिवस आधी देणे अपेक्षित असते. सदनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात याची माहितीही नवाब मलिक यांनी करुन दिली.

कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे. याची आठवणही नवाब मलिक यांनी राम कदम यांना करुन दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2019 04:56 PM IST

ताज्या बातम्या