मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आजपासून सातबारा नव्या रुपात, बहुतांश महसूल सेवा मिळणार ऑनलाईन

आजपासून सातबारा नव्या रुपात, बहुतांश महसूल सेवा मिळणार ऑनलाईन

1 ऑगस्टपासून नव्या स्वरुपात सातबारा मिळणार असून बहुतांश महसूल सेवा ऑनलाईन (Online) उपलब्ध होतील, अशी घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 1 ऑगस्ट : 1 ऑगस्ट हा दिवस महसूलदिन (Revenue Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत विविध महसूल सेवांबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. 1 ऑगस्टपासून नव्या स्वरुपात सातबारा मिळणार असून बहुतांश महसूल सेवा ऑनलाईन (Online) उपलब्ध होतील, अशी घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

पारदर्शी आणि डिजिटल

राज्यातील महसूल खात्याशी संबंधित सर्व सेवा या पारदर्शी आणि डिजिटल पद्धतीनं कशा देता येतील, याचा विचार महसूल खातं करत असून त्याबाबत जलद पावलं उचलली जात असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. राज्यात सध्या सातबारा ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करण्यात आला असून तो वेगळ्या स्वरूपात असल्याची माहिती त्यांनी दिली. सातबारा उताऱ्याचा फॉरमॅट बदलला असल्याचं थोरात म्हणाले.

महसुली कागदपत्रांमध्ये काही फेरफार करायचे असतील, तर त्यासाठी अनेकांना सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागतात. मात्र आता फेरफार करण्याची ही सोयदेखील ऑनलाईन करण्यात आली असून नागरिकांचा त्रास वाचणार असल्याचं थोरातांनी सांगितलं आहे. मिळकत पत्रिकासुद्धा आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हे वाचा -देवेंद्र फडणवीसांच्या या 26 मागण्या मुख्यमंत्री मान्य करणार?

ई पीक पाहणी

शेतकरी आता स्वतःच्या मोबाईलवरून पिकांचे फोटो काढून अपलोड करू शकतात. तलाठ्याने शेतावर जाण्याची गरज नसल्याचं थोरांतांनी म्हटलंय. कोरोना काळात स्टँप ड्युटी कमी केल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार वाढले आणि त्यामुळे महसूल वाढला, असं त्यांनी सांगितलं. मात्र महसुलातील ही सवलत पुन्हा देण्याचा सध्या तरी विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Balasaheb thorat, Online