Home /News /maharashtra /

बहिणीशी बोलणाऱ्या मुलाचा भावाने घेतला बदला, गर्लफ्रेंड बनून अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात आणि...

बहिणीशी बोलणाऱ्या मुलाचा भावाने घेतला बदला, गर्लफ्रेंड बनून अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात आणि...

आपल्या बहिणीशी बोलत असल्याचा राग मनात ठेवून एका कामगाराने आपल्याच सहकऱ्याला 3 दिवस डांबून ठेवून 15 लाखांची खंडणी मागितली होती.

भिवंडी, 10 फेब्रुवारी :  आपल्या बहिणीशी बोलत असल्याचा राग मनात ठेवून एका कामगाराने आपल्याच सहकऱ्याला 3 दिवस डांबून ठेवून 15 लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे.  पोलिसांनी मोठ्या शिताफीने या तरुणाची सुटका केली आहे. विशेष म्हणजे, आपल्याच सहकाऱ्याला जाळ्यात ओढण्यासाठी आरोपीने मित्राला मोबाइलवर महिला बोलून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. एखाद्या सिनेमात शोभावा अशी घटना घडल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पुर्णा इथं राहणारा मोहम्मद शकील खान हा एका लेडीज चप्पल बनविण्याच्या कारखान्यात काम करीत असताना 5 फेब्रुवारी सायंकाळी घरी न परतल्याने पत्नी आस्मा हिने नारपोली पोलिसांकडे दुसऱ्या दिवशी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दुसऱ्या 7 फेब्रुवारी रोजी पत्नीच्या मोबाईलवर एक फोन आला.  आपणास डांबून ठेवले असून सुटकेसाठी 15 लाखांची मागणी करीत असल्याचं पती शकील याने सांगितलं. आपल्या पतीचं अपहरण केल्यामुळे पत्नी आस्माला धक्का बसला. तिने पुन्हा नारपोली पोलिसांकडे या बाबत तक्रार दिली असता पोलिसांनी भादवी कलम 364 ( अ ) ,387,120 ( ब ) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी आलेल्या मोबाईल फोनच्या आधारे तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे अंबरनाथ येथील वस्सीउल्लाह सिताबुल्ला खान यास ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने शगिर चौधरी आणि त्याचे साथीदार यांनी अंबरनाथ येथील एक बंद गाळ्यात शटरला कुलूप लावून आतमध्ये मोहम्मद शकील यास हातपाय बांधून बंदी बनवून ठेवले असल्याचं समजलं. त्यानंतर पोलीस पथकाने स्थानिक अग्निशामक दलासोबत घटनास्थळी पोहोचले आणि  शटर उघडून मोहम्मद शकील खान या अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. मोहम्मदची सुटका केल्यानंतर त्याने पोलीस पथकाला दिलेल्या माहितीच्या आधारे सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून मुख्य आरोपी शगिर अब्दुल रहमान चौधरीला अटक करण्यात आली. मित्राला तरुणी बनवून मोहम्मदला ओढले जाळ्यात शगिर चौधरी हा एका वर्षापूर्वी अपहरण केलेल्या मोहम्मदच्या हाताखाली काम करीत होता. त्यावेळेस शकील आपल्या बहिणी सोबत बोलत असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद होता. त्यानंतर शगिर चौधरी याने काम सोडले. त्यानंतर शगिरने आपला मित्र वसीम यास शमा या बनावट महिलेच्या नावे शकीलसोबत तब्बल आठ महिने व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करायला सांगून गोडगोड बोलून त्यास भेटीसाठी बोलावले असता त्याच्या समोर महिला दिसावी म्हणून आपल्या परिचयाची स्वाती माळी हिची मदत घेऊन ती शकील यास भेटली. त्यानंतर पुन्हा 5 फेब्रुवारी रोजी भेटण्यासाठी बोलावले असता कल्याण येथून भेटीनंतर अंबरनाथ येथील जंगलात त्यास स्वाती घेऊन गेली असता तेथे आगोदरच पाळत ठेवून असलेले शगिर आणि त्याच्या साथिदारांनी मोहम्मद शकीलला पकडलं आणि अंबरनाथ इथं बंद शटरमध्ये डांबून ठेवलं. एका महिलेसह पाच जणांना अटक, एक तरुण फरार याप्रकरणी नारपोली पोलिसांनी शगीर अब्दुल रेहमान चौधरी ( वय 24 रा . उल्हासनगर ) , वसीम इसरार खान ( वय 22 रा. ग्रीनपार्क पुणे ) , अब्दुलकलाम अब्दुलसलाम खान ( वय 22 वर्ष रा . उल्हासनगर ), वसीउल्लाह सीताबुल्ला खान ( वय 22 रा . अंबरनाथ ), आणि महिला स्वाती सीताराम माळी ( वय 27 , रा . उल्हासनगर ) अशा पाच जणांना अटक केली असून सलमान ( रा. कोंढवा , पुणे ) हा फरार झाला आहे. त्याचा शोध नारपोली पोलीस घेत असून या आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पथकाने शिताफीने या गुन्ह्याचा तपास करीत गुन्हा उघड केल्याने पोलीस कामगिरीचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे ,सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व  मालोजी शिंदे यांनी पो.नि. रवींद्र वाणी, पो.उप. निरी. पुष्पराज सुर्वे ,पोहवा बोडके ,सोनावणे ,पोना गावडे ,सहारे,पोशि ताटे, सोनावणे, बाविस्कर, शिंदे, गलांडे या पथकाने महत्त्वाची कामगिरी पार पाडली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Bhiwandi

पुढील बातम्या