Home /News /maharashtra /

आता संजय राठोडांबाबत भूमिका काय? भाजपच्या चित्रा वाघांनी दिलं थेट उत्तर

आता संजय राठोडांबाबत भूमिका काय? भाजपच्या चित्रा वाघांनी दिलं थेट उत्तर

पुण्यात तरुणीने आत्महत्या केल्यानंतर संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नाव समोर आलं होतं, यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आंदोलन करत याप्रकरणाचा पाठपुरावा केला होता. ज्यामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता संजय राठोड यांनी बंड केल्यानंतर चित्रा वाघ यांना याबाबत विचारण्यात आलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 जुलै : महाराष्ट्रामध्ये गेल्या एका महिन्यात राजकीय भूकंप (Maharashtra Politics) झाला आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 39 आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांसह बंड केलं, त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ठाकरे सरकारमधल्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, तर एक मंत्री जेलमध्ये गेल्यामुळे त्याचा कार्यभार काढून घ्यावा लागला. सचिन वाझे प्रकरणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रीपदाचा तर तरुणीने आत्महत्या केल्याप्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर नवाब मलिक (Nawab Malik) यांना दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याच्या आरोपात जेलमध्ये जावं लागलं, त्यामुळे ते बिनखात्याचे मंत्री होते. यातले अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे अजून जेलमध्ये आहेत. तर संजय राठोड बंड करून शिंदे गटात दाखल झाले आहेत. पुण्यात तरुणीने आत्महत्या केल्यानंतर संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं, यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आंदोलन करत याप्रकरणाचा पाठपुरावा केला होता. आता चित्रा वाघ यांना संजय राठोड यांच्याबाबत विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे. पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीनचीट दिली आहे, यावरून चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय राठोड यांना क्लीनचीट का दिली, असा प्रश्न पुणे पोलिसांना विचारा, मी माझी लढाई अजूनही लढत आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. पुणे पोलिसांनी त्यांना कोणत्या आधारे क्लीनचीट दिली, याबाबत मला माहिती नाही. याबद्दल पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे. संजय राठोड युतीमध्ये आल्यानंतर मी ही केस मागे घेतली नाही, माझा लढा सुरूच राहील, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या