मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Chitra Wagh vs Shiv Sena : चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या वाघाला डिवचले म्हणाल्या नितीश कुमार आणि उद्धव एकच मार्ग

Chitra Wagh vs Shiv Sena : चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या वाघाला डिवचले म्हणाल्या नितीश कुमार आणि उद्धव एकच मार्ग

एकीकडे भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपसोबत काडीमोड घेत लालूप्रसाद आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केला.

एकीकडे भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपसोबत काडीमोड घेत लालूप्रसाद आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केला.

एकीकडे भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपसोबत काडीमोड घेत लालूप्रसाद आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,10 ऑगस्ट : शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. दरम्यान एकीकडे भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपसोबत काडीमोड घेत लालूप्रसाद आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केला. यावर देशभरात भाजपकडून विरोधात प्रतिक्रीया येत आहेत. यावर चित्रा वाघ (Chitra Wagh vs Shiv Sena) यांनीही नितीश कुमार यांना उद्धव ठाकरे यांचे नाव घेत डिवचल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजपला बाजूला करत नितीश कुमार यांनी आरजेडी सोबत हातमिळवणी करत सत्तांतर केले आहे. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्र भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या कि, नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात असे सूचक ट्वीट करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचले आहे. दरम्यान यामुळे शिवसेना आणि भाजप पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना अनुभवाचा सल्ला, म्हणाले...

सुशील मोदींच्या वक्तव्यावरूनही वाद

आरजेडीसोबत भाजपमध्ये असताना नितीश कुमार यांना मिळणारा आदर मिळणार नाही. भाजपकडे जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला असून त्याचे परिणाम भोगावे लागले. अशाप्रकारने नितीश कुमार यांनाही सुशील मोदी यांनी इशाला दिला.

हे ही वाचा : भाजपने सेनेसोबतही असंच केलं, म्हणत शरद पवारांनी केलं नितीशकुमारांचं कौतुक

शिवसेना खासदार अरवींद सावंतांची घाणाघाती टीका

भाजपने इंग्रजांची निती धरली आहे. ते ज्या शिडीवरुन चढतात त्याच शिडीला लाथ मारतात. बिहारमध्ये नितीश कुमार यांना त्रास देणे सुरु होते जसं इथं शिवसेनेला करत होते. त्यामुळे नितीश कुमार यांच्या एका मंत्र्यानं राजीनामा दिला होता. मात्र महाराष्ट्रातील परिस्थितीवरुन नितीश कुमार शहाणे झाले. भाजपचा कट लक्षात आल्याने नितीश कुमार यांनी त्यांचा डाव उधळला, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

First published:

Tags: Bihar, BJP, Chitra wagh, Nitish kumar, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)