विठुरायाच्या पंढरीतील चैत्र वारी रद्द, आषाढीबद्दल अद्याप कोणताही निर्णय नाही!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र वारी सोहळा रद्द करण्यात आला असला तरीही आषाढी वारीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

  • Share this:

मुंबई, 5 एप्रिल : महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेला पंढरपुरातील (Pandharpur) चैत्र वारी सोहळ्यात कोरोनाचे (Coronavirus) विघ्न आल्याने यंदा सोहळा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackaray) यांनी काल जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या (covid - 19) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व उत्सव, सोहळे रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र वारीला मोठं महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 17 मार्च रोजी भाविकांना दर्शनासाठी बंद केले. तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चैत्र वारी रद्द केल्याचे जाहीर केले.

पंढरपूरचा चैत्र वारी सोहळा हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. वारकऱ्याच्या आणि भक्त भागवताच्या अंत:करणात विठ्ठलभक्तीचे हे सूक्ष्म बीज वारीच्या निमित्ताने रुजते आणि विठ्ठलाच्या दर्शनाने त्याला बहर येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र वारी सोहळा रद्द करण्यात आला असला तरीही आषाढी वारीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

दरम्यान, यंदा देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. अशावेळी आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लोकांनी एका ठिकाणी जमा न होणं गरजेचं आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन सांगितले आहे. अशावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. पुढील काही दिवस या नियमांचे पालन करणे गरजेचे असून सर्व सण-उत्सव घरच्या घरी साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

यंदा गुढीपाडवाही नागरिकांनी घरच्या घरीच साजरा केला. त्यानुसार राज्यातील सर्व सोहळे घरात साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. याशिवाय यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या अराध्य दैवत विठ्ठलाच्या भेटीसाठी शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या चैत्र वारी रद्द केल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मंदिर समितीने दि.17 मार्च ते 31 मार्च अखेर श्री विठ्ठल -रुक्‍मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तो वाढवून आता 14 एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मात्र देवाची नित्यपुजा सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2020 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading