अस्मानी संकटाने महाराष्ट्र हादरला, 5 दिवसांत 50 जणांचा मृत्यू

अस्मानी संकटाने महाराष्ट्र हादरला, 5 दिवसांत 50 जणांचा मृत्यू

अस्मानी संकटाने महाराष्ट्र हादरला, 5 दिवसांत 50 जणांचा मृत्यू

  • Share this:

मुंबई, 3 जुलै : दुष्काळाने चिंताग्रस्त झालेल्या महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा होती. मात्र यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी संकट घेऊन आला. कारण गेल्या पाच दिवसांत विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेत 50 जणांचा मृत्यू झाला आहे.

रोजगाराच्या शोधात अनेकजण शहरांना जवळ करतात. पण याच 'स्मार्ट' शहरांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक कामगारांनी मृत्यूला कवटाळले. त्यानंतर बेजबाबदार प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल सर्वसामान्य संताप व्यक्त करत आहेत.

मृत्यूचे ते पाच दिवस

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यामुळे सुखावलेले लोक मान्सूनचं स्वागत करत होते. पण त्याचवेळी 29 जूनची सकाळ पुण्यातील मजुरांसाठी मृत्यू घेऊन आली. पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंप जवळ असलेल्या आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत (compound wall collapse) कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. आल्कन स्टायलस सोसायटीच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्यांच्या खोल्यावर रात्री दोनच्या सुमारास आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असल्याने खालच्या बाजूला असलेल्या खोल्यांवर भिंतीचा मोठा ढिगारा पडला.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतही मोठी दुर्घटना घडली. मालाड परिसरात 1 जुलैच्या रात्री झोपडपट्टीवर भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले.

मुंबई-पुण्यापाठोपाठ दुर्घटनेचं लोण पोहोचलं ते नाशिकमध्ये. इथंही बांधकाम व्यावसायिकाचा निष्काळजीपणा समोर आला. 2 जुलैला नाशकात सम्राट ग्रुपच्या सातपूर इथल्या अपना घर प्रोजेक्टमध्ये बांधकाम सुरू असताना पाण्याची टाकी फुटली. यावेळी तिथं काम करणारे जवळपास 5 कामगार या टाकीखाली अडकले. यातील तीन कामगारांचा मृत्यू झाला तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.

चिपळूणमध्ये धरण फुटलं

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun) तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण (Tiware dam) फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापैकी सहा जणांचे मृतदेह सापडले आहे.

दरम्यान, यासह महाराष्ट्रातील अनेक भागात रस्ते अपघात, वीज कोसळून झालेले मृत्यू अशाही अनेक गेल्या पाच दिवसांत समोर आल्या आहेत. त्यामुळे आमचं मरण इतकं स्वस्त झालं आहे का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं, 23 ते 25 जण वाहून गेल्याची भीती

First published: July 3, 2019, 10:02 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading