चिपळूणमध्ये भीषण घटना : सिमेंट मिक्सरमध्ये चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू

चिपळूणमध्ये भीषण घटना : सिमेंट मिक्सरमध्ये चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू

मिक्सरमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याचा मिक्सरमध्ये तोल जाऊन जागीच मृत्यू झाला.

  • Share this:

चिपळूण, 25 फेब्रुवारी : चिपळूण येथील पेढांबे इथं असलेल्या सिमेंट मिक्सर प्लॅन्टमध्ये आज मोठा अपघात झाला. मिक्सरमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याचा मिक्सरमध्ये तोल जाऊन जागीच मृत्यू झाला. मृत कर्मचारी हा कोलकाता येथील रहिवासी असून त्याचे वय 28 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच अलोरे पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

गुहागर विजापूर महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मनिषा कन्स्ट्रक्शन या कंपनीने हा ठेका घेतला असून यांचा कर्मचारी आज सकाळी नेहमी प्रमाणे कामावर रुजू झाला होता. आज दुपारच्या सुमारास सिमेंट मिक्सरमध्ये काहीतरी अडकले असल्याचे लक्षात आल्यानंतर तो कचरा काढण्यासाठी हातोडा घेऊन गेला. मात्र पुढे विपरीत घटना घडली.

हेही वाचा - मोठी बातमी : स्फोटकं सापडल्याने मुंबईसह उपनगरांमध्ये हाय अलर्ट जारी

या कर्मचाऱ्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट मिक्सरमध्ये पडला. त्यामध्ये चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या युवकाचे नाव अद्याप समजले नसून त्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून तरुणाचा दुर्दैवी मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 25, 2021, 9:55 PM IST

ताज्या बातम्या