मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! 45 वर्षीय कोरोना रुग्णानं रुग्णालयात उचललं धक्कादायक पाऊल

धक्कादायक! 45 वर्षीय कोरोना रुग्णानं रुग्णालयात उचललं धक्कादायक पाऊल

रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं 6 ऑगस्टला या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं 6 ऑगस्टला या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं 6 ऑगस्टला या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

चिपळूण, 15 ऑगस्ट : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. देशात जवळपास कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 लाख पार झाला आहे. अनेकांच्या मनात कोरोनाची खूप भीती असल्याचंही पाहायला मिळत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूणमध्ये घडला ज्यामुळे रुग्णालयात मोठी खळबळ उडाली आहे.

45 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं 6 ऑगस्टला या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा व्यक्ती चिपळूणमधील आंबडस गावातील रहिवसी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याच्यावर कामथे रुग्णालयात कोविड-19चे उपचार सुरू होते.

हे वाचा-शेवटच्या टप्प्यात टेस्ट करणाऱ्या 9 लशींमध्ये रशियन लस नाही; WHO ने केलं सावध

मध्य रात्रीच्या सुमारास या व्यक्तीनं रुग्णालयाच्या गच्चीवर जाऊन गळफास घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी टोकाचं पाऊल या रुग्णानं उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कोरोना रुग्णाच्या आत्महत्येनंतर आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ.

राज्यात काय आहे कोरोनाची स्थिती

राज्यात विक्रमी संख्येने नवे रुग्ण आढळण्याचा क्रम शुक्रवारीही कायम राहिला. शुक्रवारी 12,608 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 364 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 5,72,734 एवढी झालीय तर मृत्यू संख्या 19,427वर पोहचली आहे. 10,484 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 1,51,555 Active रुग्ण आहेत. तर 4,01,442 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Coronavirus