रत्नागिरी, 6 ऑगस्ट : चिपळूणमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या लहान भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच मोठ्या भावालाही हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्याचेही निधन झाले. दोन्ही सख्ख्या भावांचे आज गुरुवारी एकाच दिवशी निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
चिपळूण शहरातील पवारआळीमध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. संदेश पवार याला आज अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. चिपळूणमधील दवाखान्यात कुठेही त्याला घेण्यात आले नाही. म्हणून कामथे येथे नेण्यात आले. मात्र तेथे त्याचा दुपारी 1 वाजता मृत्यू झाला. आपल्या लहान भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच मोठा भाऊ सुभाष पवार याला हृदयविकाराचा धक्का बसला.
त्यानंतर त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याचाही तेथे मृत्यू झाला. लहान भावाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मोठ्या भावानेही आपले प्राण सोडले. संदेशचे वय सुमारे 48 वर्षे होते, तर सुभाषचे वय पन्नासच्या आसपास होते. संदेश पवार हा रिक्षा चालवीत असे. दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नैराश्यात गेला तरुण, कोविड सेंटरमध्येच घेतला गळफास
दरम्यान, या दोन्ही भावांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. मात्र कुटुंबातील दोन कर्ती माणसं गमावल्याने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratnagiri