Home /News /maharashtra /

मांजाने डॉक्टरचा कापला गळा, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण अन् नागरिक बसले बघत आणि मग...

मांजाने डॉक्टरचा कापला गळा, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण अन् नागरिक बसले बघत आणि मग...

चायनीज मांजामुळे एका डॉक्टरचा गळा कापल्याची घटना समोर आली आहे.

जळगाव, 5 सप्टेंबर : जळगाव शहरातील सालार नगरात राहणाऱ्या एक डॉक्टर दुचाकीने जात असताना खांबाला अडकलेल्या चायना मांजामुळे त्यांचा गळा कापला (Chinese manjha slits throat) गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर देखील डॉक्टर 10 मिनिटे जागीच पडून होते. एका रिक्षाचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने डॉक्टरचे प्राण वाचले आहेत. अमरावती येथील जवाद अहमद (Javed Ahmed) यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून जळगावात ते सध्या प्रशिक्षण घेत आहेत. डॉ. अहमद हे सालार नगरात राहत असून ते दुचाकीने जात असताना महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ चायना मांजा अचानक त्यांच्या गळ्यावर आला आणि लागलीच त्यांचा गळा कापला गेला. गळा कापल्यानंतर डॉ. अहमद हे रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीसह खाली कोसळले. स्वतः डॉक्‍टर असल्याने त्यांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्त्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. सुमारे दहा मिनिटे हा प्रकार ये-जा करणारे नागरिक पहात होते मात्र तरीही कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. मात्र रिक्षाचालक कलीम शेख यांनी प्रसंगावधान राखून डॉक्टर अहमद यांना रिक्षात टाकले आणि रुग्णालय गाठले. मुंबई - दापोली एसटीला रत्नागिरीतील शेनाळे घाटात अपघात रुग्णालयातील वैद्यकीय प्रमुख डॉ. मिनाज पटेल, नर्सिंग सुप्रीटेंडन्ट हर्षल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव रोखला. डॉ. अहमद यांच्या गळ्यात 1 आणि गळ्यावर 11 टाके टाकण्यात आले. डॉ. अहमद यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, तसेच त्यांच्या हृदयाचे ठोके देखील कमी पडू लागले होते. वेळीच उपचार मिळाले नसते तर त्यांचा जीव गेला असता असे डॉ. मिनाज पटेल यांनी सांगितले. चायना मांजामुळे दरवर्षी देशभरात अनेकांचा जीव जात असतो. शासनाने या मांजावर बंदी घातली असली तरी त्याची खुलेआम विक्री केली जाते. डॉ. अहमद यांना वैद्यकीय ज्ञान असल्याने ते बचावले असले तरी इतर कुणाचा बळी जाऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Jalgaon

पुढील बातम्या