शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमची जामिनावर सुटका

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमची जामिनावर सुटका

शिवजयंतीच्या काही दिवस अगोदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान श्रीपाद छिंदमने केले होते. तेव्हा नगरचा उपमहापौर असून त्याच्या विधानाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती

  • Share this:

13 मार्च: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे.

शिवजयंतीच्या काही दिवस अगोदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान  श्रीपाद छिंदमने केले होते. तेव्हा नगरचा उपमहापौर असून त्याच्या विधानाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.यामुळे जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि छिंदमला उपमहापौरपदावरून काढून टाकण्यात आलं होतं.  त्याला अटकही करण्यात आली होती. पुढे छिंदमला लोकांच्या विरोधापायी नगरच्या कारागृहातून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात  हलवण्यात आलं होतं. आता जामिनावर छिंदम याची सुटका झाली आहे.

आता येत्या काळात  छिंदमला काही  शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. छिंदम यावरून  भरपूर ट्रोलही करण्यात आलं होतं.

 

 

First published: March 13, 2018, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading