लढत विधानसभेची : चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप हॅटट्रिक करणार का?

लढत विधानसभेची : चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप हॅटट्रिक करणार का?

चिंचवड मतदारसंघावर सध्या भाजपचं वर्चस्व आहे. दोन वेळा निवडून आलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आता तिसऱ्या वेळीही विजय मिळवणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.

  • Share this:

चिंचवड, 17 सप्टेंबर : चिंचवड मतदारसंघावर सध्या भाजपचं वर्चस्व आहे. दोन वेळा निवडून आलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आता तिसऱ्या वेळीही विजय मिळवणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर शिवसेनेकडून राहुल कलाटे रिंगणात उतरतील. तेव्हा मात्र लक्ष्मण जगताप यांच्यापुढे आव्हान निर्माण होईल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इथे लढायलाही अनेक जण उत्सुक आहेत.

पिंपरी विधानसभेच्या तुलनेत हा मतदारसंघ सुशिक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर उद्योजक, व्यावसायिक आणि आयटी क्षेत्रात काम करणारे मतदारही इथे जास्त संख्येने आहेत.

2009 मध्ये चिंचवड मतदारसंघ काँग्रेसकडे आला त्यामुळे राष्ट्रवादीचे लक्ष्मण जगताप इथे अपक्ष म्हणून लढले. 2014 मध्ये ते भाजपकडून लढले आणि आमदार झाले. त्यांनी शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला होता.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघात युतीला 96 हजार 758 मतांचं विक्रमी मताधिक्य मिळालं. त्यामुळे आताही लक्ष्मण जगताप यांना विजयाची खात्री आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक उमेदवारांची नावं चर्चेत असली तरी लक्ष्मण जगताप यांना आव्हान देईल असा तगडा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. असं असलं तरी चिंचवडमधली मुख्य लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे.

शरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल!

मावळ लोकसभा 2019 : चिंचवड विधानसभा मतदारसंघातलं मतदान

श्रीरंग बारणे (शिवसेना) - 1 लाख 76 हजार 475

पार्थ अजित पवार (राष्ट्रवादी) - 79 हजार 717

चिंचवड विधानसभा निवडणूक, 2014 मतदान

लक्ष्मण जगताप, भाजप १ लाख २३ हजार ७८६

राहुल कलाटे, शिवसेना-६३ हजार ४८९

========================================================================================

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन

Published by: Arti Kulkarni
First published: September 17, 2019, 8:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading