आई-वडील कामावर, घरी साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाने केला बलात्कार

आई-वडील कामावर, घरी साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाने केला बलात्कार

नागपूरच्या वाडी भागात साडेतीन वर्षांची मुलगी घरी ठेवून दाम्पत्य कामावर गेलं होतं.

  • Share this:

नागपूर, 11 जून : आई-वडील कामावर गेले असताना घरी असलेल्या त्यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही संतापजनक घटना नागपूरमध्ये घडली असून चिमुकलीवर बलात्कार करणारा 25 वर्षीय आरोपी फरार झाला आहे.

नागपूरच्या वाडी भागात साडेतीन वर्षांची मुलगी घरी ठेवून दाम्पत्य कामावर गेलं होतं. आई-वडील कामावर गेले असल्याने साडेतीन वर्षाची लहानगी शेजारी असणाऱ्या लहान मुलांसोबत खेळण्यात दंग होती. त्यानंतर तिथं आलेल्या भूषण दहाट या आरोपीने त्या चिमुकलीला बाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

अवघ्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर वाडी परिसरात संतापाची लाट पसरली आहे. चिमुकलीवर बलात्कार केल्यानंतर 25 वर्षीय आरोपी भूषण दहाट हा तिथून फरार झाला.

दरम्यान, या घटनेबाबत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

औरंगाबादेत बारचालकाची ग्राहकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

First published: June 11, 2019, 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading