• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मंदिर परिसरता मुलाला लघुशंका करू दिली नाही, पोलिसाने पुजाऱ्याला केली मारहाण, बीडमधील घटना

मंदिर परिसरता मुलाला लघुशंका करू दिली नाही, पोलिसाने पुजाऱ्याला केली मारहाण, बीडमधील घटना

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Share this:
बीड, 03 ऑक्टोबर : पोराला बोलल्याचा राग डोक्यात धरून सहाय्यक पोलीस निरिक्षकाने (Assistant Police Inspector) राममंदिराच्या पुजाऱ्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील (beed) गेवराई तालुक्यात उघडकीस आली आहे, या घटनेविरोधात गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी करत चकलांबा पोलीस ठाण्याला घेराव घालत आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार,  गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील श्रीराम मंदिराचे पुजारी गणपत देशपांडे (ganpat deshpande) यांनी पोलीस ठाण्याचे फौजदार दिगंबर पवार (digambar pawar) यांच्या मुलाला मंदिर परिसरात लघुशंका करण्यास मनाई केली होती. याबाबत मुलाने वडिलांना तक्रार केल्यानंतर  पवार यांनी कुठलाही विचार न करता देशपांडे यांना त्यांच्या घरातून बाहेर काढत लाथाबुक्यांनी मारहाण केली. घराच्या बाहेर खेचून दिगंबर पवार यांनी गणपत देशपांडे यांना बेदम मारहाण केली. शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी घातली कार, आंदोलक झाले आक्रमक देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.  स्थानिकांनी या प्रकरणी फौजदार दिगंबर पवार यांच्याविरोधात पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. वादळी खेळीनंतर यशस्वी CSK ड्रेसिंग रूममध्ये,धोनीचं आयुष्यभर लक्षात राहणारं गिफ्ट या प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक याना विचारलं असता या घटनेची दखल घेत संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्याचे आश्वासन दिले आहे.
Published by:sachin Salve
First published: