मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आधी उसाच्या फडात नेऊन धमकावलं, नंतर 11 वर्षीय मुलीसोबत लावलं तरुणाचं लग्न, परभणीतील घटना

आधी उसाच्या फडात नेऊन धमकावलं, नंतर 11 वर्षीय मुलीसोबत लावलं तरुणाचं लग्न, परभणीतील घटना


    हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, मुलीचे नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, मुलीचे नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, मुलीचे नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले

परभणी, 20 जुलै :  परभणी (parbhani) जिल्ह्यातील  मंजरथ गावातील अकरा वर्षीय मुलीचा (minor girl ) 28 वर्षीय युवकासोबत जबरदस्तीने विवाह (Child marriage) लावल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. बालविवाह बंदी कायदाला हरताळ फासला गेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा, राज्यात बालविवाह सुरू असल्याचं विदारक चित्र पुढे आलं आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या मंजरथ या गावांमध्ये, आठ ते नऊ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. गावातील शेतामध्ये खुरपणी करत असताना अल्पवयीन मुलगी आणि तिची आई, यांना 28 वर्षीय किशोर सुळ या युवकांने आपल्या साथीदाराच्या मदतीने उसाच्या फडात नेऊन, जीवे मारण्याची धमकी दिली. आणि त्यानंतर, आईला मुलीचा बालविवाह लावण्यास भाग पाडले, असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

स्लिम ट्रिम होण्यासाठी झोपण्याआधी फॉलो करा ‘या’ Tips; रात्रीतून होईल वजन कमी

हा प्रकार झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांना याची कुणकुण लागली. त्यानंतर मुलीच्या घरातील लोकांना विश्वासात घेऊन, विचारल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी हा विवाह बेकायदेशीर असून आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली आहे.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, मुलीचे नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले. आरोपी, लग्न लावणारा भटजी, आणि अन्य जणांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. पण, झालेला प्रकार हा धक्कादायक असून, पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालणारा आहे. आणि त्यामुळे आरोपी विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी, सामाजिक संघटनांकडून होऊ लागली आहे..

Kitchen Hacks: खराब फ्रिज मिनटात चमकेल; असा करा साफ

या प्रकरणी आरोपी आणि इतर तरुणांविरोधात पाथरी पोलिस ठाण्यात बालविवाह कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. त्यावर सध्या तरी पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे.

First published:

Tags: Child marriage