Home /News /maharashtra /

पोलिसांची वेळेवर एण्ट्री झाली आणि रोखला गेला बालविवाह!

पोलिसांची वेळेवर एण्ट्री झाली आणि रोखला गेला बालविवाह!

पंढरपूर तालुक्यातील चळे याठिकाणीही असाच प्रकार समोर आला आहे.

    वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 4 फेब्रुवारी : बालविवाहाबाबत कायदा होऊन कितीतरी वर्ष लोटली असली तरीही असे प्रकार अद्यापही थांबताना दिसत नाहीत. चांगलं शिक्षण घेऊन करिअर घडवण्याआधीच मुलांना बोहल्यावर चढवलं जातं. पंढरपूर तालुक्यातील चळे याठिकाणीही असाच प्रकार समोर आला आहे. चळे इथं होऊ घातलेला बालविवाह आज दुपारी पोलिसाच्या मध्यस्थीने रोखण्यात आला. यामध्ये निर्भया पथक तसेच चाईल्ड वेलफ़ेअर कमिटी आणि पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. पोलिसांना 3 फ़ेब्रुवारी 2020 रोजी एक निनावी तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार चळे गावामध्ये मंगळवारी दुपारी 11 वाजून 55 मिनिटांनी बालविवाह होणार होता. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चाइल्ड वेलफेअर कमिटी आणि निर्भया पथकास सोबत घेवून हा बालविवाह रोखला. यामध्ये नियोजीत मुहूर्तापूर्वी पोलिसांनी अल्वयीन मुलींच्या पालकांना बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. तसंच याबाबतच्या प्रतिबंधात्मक कायद्याची देखील माहिती दिली. यानंतर सदरचा बालविवाह हा यशस्वीपणे रोखला गेला. धक्कादायक! पोलिसांवरच झाला हल्ला, वाळू तस्करांनी दगडफेक करून केलं जखमी याप्रकरणी चाइल्ड वेलफेअर कमिटी सोलापूरच्या अध्यक्षा यांच्या समक्ष संबधित अल्पवयीन मुलीस पालकांसमवेत हजर केले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.  सागर कवडे तसेच पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक श्री किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गाडेकर आदी सहभागी होते.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pandharpur, Pandharpur crime

    पुढील बातम्या