'शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत'

'शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत'

थोड्या वेळेआधीच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्या सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर : लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. त्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाही अशी ठाम प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. थोड्या वेळेआधीच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्या सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. त्यावर 'सुधीरभाऊचं शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला ही गोड बातमी देतील' असंही संजय राऊत म्हणाले आहे. काही वेळेआधी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला सत्ता स्थापनेचा दावा आणि आताय शिवसेनेनी दिलेली प्रतिक्रिया यावरून राजकीय वातावरणात सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला दिसतो तर यामुळे जनतेममध्ये आणि राजकीय वर्तुळात संभ्रम आहे.

उद्या भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेची माहिती देणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना सांगितलं. काहीही झालं तरी सत्ता ही महायुतीचीच येणार असल्याचा विश्वास यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. तर सत्ता स्थापनेची माहिती देण्यासाठी ते उद्या राज्यपालांनाही भेटणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावर शिवसेनेनंही मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या दाव्यानंतर संजय राऊतांच्या प्रतिक्रितील महत्त्वाचे मुद्दे

- शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत.

- महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय

- भाजप नेते सरकार स्थापनेचा दावा करत असतील तर आमचीही तीच मागणी आहे. सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांना भेटणं हे त्यांचं कर्तव्य आहे.

- 145 आमदारांची यादी देणार असतील तर आनंद आहे.

इतर बातम्या - निकालानंतरची सगळ्यात मोठी बातमी, भाजप करणार उद्या सत्ता स्थापनेचा दावा!

- उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. त्यांच्याकडून कुठल्याही प्रस्तावाची माहिती मिळालेली नाही.

- काँग्रेसच्या प्रमुख आमदारांची भावना भाजपविरोधी असू शकते. त्यात गैर काही नाही.

- उद्या उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. भाजप-शिवसेना सत्तासंघर्षावर पुन्हा एकदा आज चर्चा करण्यात आली आहे.

इतर बातम्या - सत्ता स्थापनेसाठी भाजपचे एक पाऊल पुढे, मुनगंटीवारांची UNCUT पत्रकार परिषद

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांची बैठक घेतली. सरकारनं सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला 25 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानं आपण बैठकीला उपस्थित असं सेना नेत्यांनी आवर्जून सांगण्यात आलं.

उद्या होणार शिवसेनेचा फैसला, उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक

राज्यातला सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरच्या रात्री संपणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सत्तास्थापनेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या गुरुवारी (7 नोव्हेंबर) बोलावली आहे. शिवसेना भवनात सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे हे सर्व आमदारांची मतं जाणून घेणार आहेत. त्यानंतर शिवसेनेचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भाजपने योग्य वाटा दिला नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायचं का असा शिवसेनेसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपवर दबाव आणून शक्य तेवढं जास्त मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

इतर बातम्या - इतर बातम्या - सुजय विखेंना सुरक्षा देणाऱ्या पोलीस वाहनाचा भीषण अपघात, 150 फूट दरीत कोसळली कार

राज्यात गावपातळीवर शिवसेनेचा मुकाबला हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी असून त्यांच्यासोबत सत्तेत जाणं परवडणारं आहे का याबद्दलची मतं आमदारांकडून जाणून घेतली जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांची वेगळी मतंही उद्धव ठाकरे ऐकून घेणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 06:27 PM IST

ताज्या बातम्या