• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पुण्यात मुख्यमंत्र्यांसह कोणीही राहणार नाही उपस्थित

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पुण्यात मुख्यमंत्र्यांसह कोणीही राहणार नाही उपस्थित

राजशिष्टारानुसार पंतप्रधान संबंधित राज्याच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल, मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करतात

 • Share this:
  मुंबई, 27 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या, शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र, पुण्यात पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray), राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsing koshyari), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित राहणार नाही. पंतप्रधान कार्यालयातून (PMO) तशा सूचना देण्यात आल्याचं समजतं. पंतप्रधान कोरोना काळात अल्प कालावधीसाठी पुणे दौरा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी कोणीही उपस्थित येऊ नये, असा निरोप प्रशासनाला मिळाला आहे. हेही वाचा...असा असेल नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, तासभरात कोरोना लस निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार राजशिष्टारानुसार पंतप्रधान संबंधित राज्याच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल, मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करतात. पण यावेळी कोणीही उपस्थित राहू नये, अशा पीएमओकडून सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पीएम मोदी यांच्या स्वागतास राज्यपाल आणि सीएम ठाकरे उपस्थितीत नसणार, असंही समजतं. दिलीप वळसे पाटील स्वागत करतील... अजित पवार हे देखील पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नसणार आहेत. अजित पवार यांच्याऐवजी दिलीप वळसे पाटील स्वागत करतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालय माहिती दिली आहे. शरद पवार यांचा ही तुर्तास बारामती येथे नियोजित कार्यक्रम असणार आहे, अशी माहिती शरद पवार यांच्या कार्यालयातून देण्सात आली आहे. 100 देशांच्या राजदुतांचा 4 डिसेंबरचा नियोजित पुणे दौरा रद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इनस्टीट्युटला भेट देणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात निरोप आला आहे. दौऱ्याची पुढची तारीखही अद्याप निश्चित नाही. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याची पूर्ण तयारी झाल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. पंतप्रधान या दौऱ्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला (Serum Institute Pune) भेट देणार आहेत. कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ते समजून घेणार आहेत. असा असेल पंतप्रधानांचा पुणे दौरा... 28 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजून 25 मिनिटांला अहमदाबाहून पुणे विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरूनच ते थेट सीरम इनस्टिट्यूटला हेलिकॉप्टरनं रवाना होतील. दुपारी 1 वाजून 05 मिनिटं ते 2 वाजून 05 मिनिटं या एक तासांच्या कालावधीत ते सीरम इनस्टिट्यूटला भेट देतील. संबंधित अधिकाऱ्यांकडून कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतील. नंतर ते पुन्हा विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांला पुणे विमानतळावरून तेलंगाणाकडे रवाना होतील. हेही वाचा...मग कोणी महाराष्ट्रासह मुंबईबद्दल असभ्य भाष्य करते, ती मानहानी नाही का? संजय राऊत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसची निर्मितीचं काम सुरू आहे. त्यामुळे या लसीकडे संपूर्ण देशासह जगाचे लक्ष लागलं आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं तयारी सुरू केल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
  Published by:Sandip Parolekar
  First published: