मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा साधेपणा, राजेशाही खुर्चीवर बसायला दिला नकार, VIDEO

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा साधेपणा, राजेशाही खुर्चीवर बसायला दिला नकार, VIDEO

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आहे. आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन पार पडले.

  • Share this:

औरंगाबाद, 12 डिसेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackery) यांना 'कुटुंबप्रमुख' जसे ओळखले जाते, तसाच त्यांचा साधेपणाही नेहमी चर्चेचा विषय असतो. आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा साधेपणा  पाहण्यास मिळाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आहे. आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन पार पडले. उद्धव ठाकरे जेव्हा व्यासपीठावर पोहोचले होते तेव्हा त्यांच्यासाठी राजेशाही खुर्ची ठेवण्यात आली होती. इतर मान्यवरांसाठी ही साधी खुर्ची ठेवलेली होती.

मुख्यमंत्री राजेशाही खुर्चीजवळ पोहोचले असता समोरील प्रकार पाहून त्यांनी तातडीने राजेशाही खुर्ची बाजूला हटवण्याची सूचना दिली. सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने व्यासपीठावरून राजेशाही खुर्ची हटवली आणि त्या जागी साधी खुर्ची ठेवली. त्यानंतरच मुख्यमंत्री ठाकरे हे साध्या खुर्चीवर बसले. मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून शिवसेनेचे नेते, मंत्री आणि पालिकेचे कर्मचारी भारावून गेले होते.

'कोरोना काळात बसून केलेल्या कामाच्या शुभारंभाची सुरुवात झाली आहे.अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा योजना रखडली होती. नुसता लेझीम खेळ सुरू होता. माझ्या कवाडीमुळे लोकांच्या घरात पाणी जात असेल तर माझं भाग्य आहे. काम न करता मला लाडका मुख्यमंत्री व्हायच नाही. काम करून मला लाडकं व्हायचे आहे' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टोला लगावला.

शेवटच्या माणसालाही जपलं पाहिजे, वाढदिवशी शरद पवारांनी दिला नेत्यांना कानमंत्र

तसंच, 'शहरात अनेक ठिकाणी अनेकांनी रस्त्यात खड्डे पडलेत ते आता मला बुजवायचे आहे. नुसतं भूमीपूजन करून थांबणार नाही. या योजनेची मी कधीही गुपचूप येईन योजनेची पाहणी करेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

'1 मे पर्यंत समृद्धी महामार्ग सुरू करणार आहे. औरंगाबाद विमानतळ नामकरण छत्रपती शिवाजी महाराज असा प्रस्ताव टाकलेला आहे.  शहरातील गुंठेवारीचा प्रश्न लगेच सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मला आता औरंगाबादचा विकास करण्याची घाई झाली आहे.

मी फक्त घोषणा करत नाही तर शुभारंभ करतो. आम्ही काम करतो म्हणून औरंगाबादकर शिवसेनेवर प्रेम करतात' असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: December 12, 2020, 5:06 PM IST

ताज्या बातम्या