मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वस्तीत जाऊन घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वस्तीत जाऊन घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

'मी आता मृत बाळांच्या कुटुंबीयांना भेटलो. त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहण्याशिवाय  कोणतेही शब्द माझ्याजवळ नव्हते'

'मी आता मृत बाळांच्या कुटुंबीयांना भेटलो. त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहण्याशिवाय कोणतेही शब्द माझ्याजवळ नव्हते'

'मी आता मृत बाळांच्या कुटुंबीयांना भेटलो. त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहण्याशिवाय कोणतेही शब्द माझ्याजवळ नव्हते'

  • Published by:  sachin Salve

भंडारा, 10 जानेवारी :  भंडारा जिल्हा रुग्णालयात ( Bhandara District General Hospital) 10 नवजात बाळांच्या गुदमरुन मृत्यू झाल्यामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेतील गीता विश्वनाथ बेहरे यांच्या सोणझरी वस्तीत असलेल्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसंच तुमसर तालुक्यातील सालेकसा  येथील कविता बारेलाल कुमरे या महिलेला भेटून या दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन केले.

'घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक व वेदनादायी आहे आपल्या दुःखात मी सहभागी आहे. शासन आपल्या सोबत असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.

तसंच, प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भावुक प्रतिक्रिया दिली. 'भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये काय घडले याचा तपास पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही. मी आता मृत बाळांच्या कुटुंबीयांना भेटलो. त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहण्याखेरीस कोणतेही शब्द माझ्याजवळ नव्हते. कारण सांत्वन करता येईल, एवढे शब्द माझ्याकडे नाही' अशी भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

'या घटनेची चौकशी केली जाणार आहे. अपघात हा अचानक घडला आहे की आधी अहवाल देऊनही दुर्घटना घडली, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य कोरोना सारख्या संकटाचा सामना करत आहे. या काळात कोणत्या गोष्टीकडे डोळेझाक केली गेली आहे का?  याच्या चौकशीचे आदेश आधीच देण्यात आले आहे. सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी एक समिती तयार केली आहे. ती संपूर्ण चौकशी करणार आहे. विभागीय आयुक्तांना याची जबाबदारी देण्यात आली आहे. कुठेही कसर राहणार नाही. जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल' असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

First published: