Home /News /maharashtra /

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सांगली दौरा, अंकलखोपच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी; भिलवडीतील पूरग्रस्तांशी साधणार संवाद

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सांगली दौरा, अंकलखोपच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी; भिलवडीतील पूरग्रस्तांशी साधणार संवाद

Uddhav Thackeray In Sangli: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. आज मुख्यमंत्री पूरबाधित गावांची पाहणी करतील.

  मुंबई, 02 ऑगस्ट: सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), कोकण (kokan) भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती (Flood) ओढावली. त्यामुळे बरंच नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आज सांगली जिल्ह्याचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. आज मुख्यमंत्री पूरबाधित गावांची पाहणी करतील. याआधी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा दौरा केला होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास ते विमानानं कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्यातील पलूसपर्यंत पोहोचतील. पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरातील पूर बाधित क्षेत्राची ते पाहणी करतील.

  चिंता करण्याची गरज नाही! पुण्यातील Zika virus रुग्णाबाबत मिळाली महत्त्वाची अपडेट

  कसबे डिग्रज येथे पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्री सांगलीत दाखल होतील. सांगलीत आढावा बैठक झाल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. असा असेल मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा सकाळी 8.40 वा. मातोश्री निवासस्थान येथून गाडीनं मुंबई विमानतळ सांताक्रुझकडे प्रयाण. सकाळी 8.55 वा. मुंबई विमानतळ सांताक्रुझ येथे आगमन. सकाळी 9 वा. विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.55 वा.गाडीने भिलवडी ता-पलूस, जिल्हा - सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. भिलवडी, ता-पलूस येथे आगमन आणि पुरामुळे बाधीत भागाची पाहणी आणि नागरिकांशी संवाद. सकाळी 11.05 वा. गाडीने अंकलखोप, ता-पलूसकडे प्रयाण. सकाळी 11.10 वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन आणि पुरामुळे बाधीत भागाची पाहणी आणि नागरिकांशी संवाद. सकाळी 11.20 वा. गाडीने कसबे डिग्रज, जिल्हा- सांगलीकडे प्रयाण सकाळी 11.55 वा. कसबे डिग्रज जिल्हा - सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.05 वा. गाडीने मौजे डिग्रज, जिल्हा –सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.10 वा. मौजे डिग्रज, जिल्हा – सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.20 वा. गाडीने आयर्विन पुल, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. आयर्विन पुल, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.40 वा. गाडीने हरभट रोड, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.55 वा. गाडीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. दुपारी 1.45 वा. गाडीने भारती विद्यापीठ, भारती मेडिकल कॉलेजकडे प्रयाण. दुपारी 1.50 वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी 2.15 वा. गाडीने कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन दुपारी 3.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Sangli (City/Town/Village), Uddhav thackeray

  पुढील बातम्या