मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयात केला मोठा बदल, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयात केला मोठा बदल, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात अचानक केलेल्या बदलांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात अचानक केलेल्या बदलांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात अचानक केलेल्या बदलांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

मुंबई, 17 जुलै : राज्यात कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे सध्या चिंतेचं वातावरण असताना राजकीय वातावरणदेखील गरम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मोठा बदल केला आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात अचानक केलेल्या बदलांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची राज्य शिष्टाचार मंत्रालयाच्या प्रन्सीपल सेक्रेटरी आणि प्रमुख राज्य शिष्टाचार अधिकारी पदावरून पर्यटन मंत्रालयाच्या प्रिन्सीपल सेक्रेटरी पदावर बदली करण्यात आली आहे. तर पर्यटन मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या मँनेजिंग डायरेक्टर पदावर मुंबई महापालिकेचे सहआयुक्त आशुतोष सलील यांची बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्रात या जिल्ह्यात पुन्हा वाढणार लॉकडाऊन, महत्त्वाची बैठक सुरू आदित्य ठाकरे यांच्याच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी अचानक केलेल्या महत्वाच्या बदल्यांमुळे राजकिय वर्तुळात आश्चर्य व्यक्तं केलं जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पुन्हा एकदा बैठक झाली होती. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पवारांनी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली होती. धक्कादायक: मुंबईत कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण महिलेवर बलात्कार आठवडाभरात या दोन्ही नेत्यांची ही चौथी बैठक होती. त्यामुळे आघाडीत नेमकं काय चाललं याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. तर मी नियमित मुख्यमंत्र्यांची भेट घेतो त्यात फारसं काहीही नाही असं स्पष्टीकरण शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच दिलं होतं. राजस्थानमधल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावध झाले असून नाराज असलेल्या काँग्रेससोबत संवाद वाढविण्याचे संकेत त्यांनी दिल्याचं बोललं जात आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली होती.
First published:

Tags: Aaditya thackeray, Uddhav thackeray

पुढील बातम्या