Home /News /maharashtra /

मुख्यमंत्री ठाकरेंचं भाजपला चोख प्रत्युत्तर; अशोक चव्हाणांच्या जबाबदारीत केली वाढ

मुख्यमंत्री ठाकरेंचं भाजपला चोख प्रत्युत्तर; अशोक चव्हाणांच्या जबाबदारीत केली वाढ

उद्धव ठाकरे यांच्या या एका निर्णयामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे

    मुंबई, 18 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे काही नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते. आमदार विनायक मेटे यांनीही मागणी उचलून धरली होती. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयामुळे भाजप नेत्यांना प्रत्युत्तर मिळालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणविषयक कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या या उपसमितीत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार सदस्य आहेत. हीच समिती आता मराठा समाजाच्या इतर मागण्यांचाही पाठपुरावा करेल. अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला एकप्रकारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. मागील काही दिवस आ. विनायक मेटे ही मागणी करीत होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Udhav thackarey

    पुढील बातम्या