मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अब्दुल सत्तारांच्या 'मुन्नाभाई' प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे न बोलताच निघून गेले

अब्दुल सत्तारांच्या 'मुन्नाभाई' प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे न बोलताच निघून गेले

शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलीचा समावेश असल्याची बाब समोर आली.

शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलीचा समावेश असल्याची बाब समोर आली.

शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलीचा समावेश असल्याची बाब समोर आली.

    मुंबई, 08 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यात (TET exam scam case) शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलीचा समावेश असल्याची बाब समोर आली. अब्दुल सत्तार यांच्या या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारले असताना त्यांनी बोलण्याचे टाळले. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचलं आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. मात्र सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत. यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचा आणि मुलाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. अपात्र असतानाही सत्तार यांच्या मुलींनी पगार लाटल्याचेही समोर आले आहे. याच प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले पण सत्तार यांच्या या पराक्रमावर शिंदे यांनी एक शब्दानेही प्रतिक्रिया न देता निघून गेले. (शिवसेना 'कोसळली' अन् बाळासाहेबांनी शिवतीर्थावर लावले गुलमोहराचे झाडही कोसळले) दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. 'माझा मुलगा टीईटी परिक्षा दिली नाही, मुली अपात्र आहेत. त्या अपात्रतेमुळे ६ हजार पगार माझ्या मुलीला मिळत नाही. जे नियम गरिबांच्या मुलांना तोच नियम माझ्या मुलांना आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रकरणाची चौकशी करावी. या प्रकरणी चौकशी करता मी स्वतः स्पष्टीकरण देत ही माहिती फेक असल्याचे सांगितले, असं सत्तार म्हणाले. प्रशासनाकडून याबाबत चौकशी झाली पाहिजे, मुली अपात्र झाले काम बंद झाले टीईटी परिक्षेचा रेकॅार्ड ईडीकडून तपासला जाईल. चंद्रकांत खैरे, ‌अंबादास दानवे यांनी एकत्र येऊन खटले चालवावे, असं आव्हानही सत्तारांनी दिलं. (McDonaldचं पार्सल नेणं प्रवाशाला पडलं महागात, एअरपोर्टवर झाला 1500 पाउंडचा दंड) 'मंत्रिपद हे मी ३ वेळा अनुभवले आहे जे होईल ते बघितले जाईल त्यांना जेसीबी पोकलेन लाऊन जी माहिती समोर आणायची ती आणि देत पण यात काहीच हाती लागणार नाही, असंही सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाबतीत विरोधकांनी चिंता करू नये आमचा मुख्यमंत्री धक्काबुक्की करून फोटोसाठी पुढे येणारे व्यक्ती नाही. ते अत्यंत साधे आणि सरळ आहे. त्यांना कोणताही इगो नाही, त्यामुळे नीती आयोगाच्या बैठकीमध्ये फोटो काढत असताना तिथे जागा मिळाली असेल तिथे ते उभे राहिले असेल, असं सत्तार म्हणाले. ईडी चौकशीत माझी मुलं जर अपात्र असून पात्र दाखवली तर कारवाई करण्यात येईल. आम्ही नाव लपवून ठेवली नाही. मी फेक यादी समोर आली त्यातून रेकॉर्ड दाखवून दिले. घराची बदनामी झाली ते बघा मंत्रीपद जाऊ द्या कायदेशीर चौकशी झाली पाहिजे, असंही सत्तार म्हणाले. 'ते काय बोललेले ते चुकीचे नाही. जेव्हा सरकार आले तेव्हा वेळ लागणार आहे लोकांची मागणी आहे. त्यामुळे ते स्वाभाविक आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे, १५ ॲागस्टपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होईल, असंही सत्तार यांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या