मुंबई, 30 मे : तुम्हाला प्रशासनात काम करायचंय? त्यासाठी उत्तम संधी आहे. मुख्यमंत्री फेलोशिप 2019ची घोषणा केली गेलीय. उद्याचा महाराष्ट्र घडवण्यात माझ्याबरोबर सहभागी व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनीच केलंय. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं वय 21 ते 26 वर्षाच्या मधे हवं. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले कोणत्याही शाखेचे पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर यात प्रवेश घेऊ शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून. त्याबद्दलच जाणून घेऊ या.
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ११ महिन्यांच्या कालावधी आहे. उमेदवाराला दर महिन्याला 35 हजार रुपये फेलोशिप मिळेल. नामांकित संस्था, उद्योग वा सार्वजनिक उपक्रम संस्थेतील कमीत कमी १ वर्षाचा अनुभव असलेले तरुण या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतील. आयआयटी, आयआयएम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयं, एनआयटी, जेबीआयएमएस, व्हीजेटीआय, व्हीएनआयटी यासारख्या नामांकित शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी अनुभवाची अट शिथिल केली जाईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवकांना कार्यक्रमानंतर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी करता येईल किंवा उच्च शिक्षण घेता येईल.
पंतप्रधानांच्या संग्रहात 10 हजार पुस्तकं; या मराठी लेखकाचे नरेंद्र मोदी चाहते
तरुणांमध्ये नेतृत्त्वगुण विकसीत होतील, सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना तसा अनुभव मिळेल असा हा अभ्यासक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारसोबत काम करण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीत अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयामार्फत राबवण्यात येत आहे. या 11 महिन्यात शासनासोबत काम करण्याची संधी देणं, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, समाजिक विकास क्षेत्रातील विविध उपक्रम आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीत आणि धोरण निर्मितीत त्यांना सहभागी करून घेणं, हा उद्देश आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात धक्कादायक बदल होणार? या 5 गोष्टींबाबत मोठा सस्पेन्स
भविष्यातील संधी
सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रात आपल्या आवडीचे करिअर निवडताना या कार्यक्रमातील सहभागाचा निश्चितच उपयोग होईल. शेवटी मिळणारं सर्टिफिकेट व्यावसायिक वाटचालीत महत्त्वाचं असेल.
स्वत:ची संस्था सुरू करताना या अनुभवाचा लाभ होईल.
धोरण आणि प्रशासन विषयाचं अभ्यासक्रमाचं पदव्युत्तर शिक्षण घेताना हा अनुभव उपयोगी पडेल.
महत्त्वाच्या गोष्टी
फेलोशिप कार्यक्रमाची मुदत केवळ ११ महिने असेल
महाराष्ट्र शासन फेलोशिपनंतर कोणत्याही नोकरीची हमी देत नाही
निवड झालेल्या उमेदवारास या कार्यक्रमादरम्यान कोणतीही इतर नोकरी वा काम करता येणार नाही.
कार्यक्रमादरम्यान उमेदवारास महाराष्ट्रात रहावं लागेल.
बाहेरील उमेदवारांची राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.
कार्यक्रम कालावधीत दरमहा 35 हजार रुपये मानधन दिलं जाईल.
पंतप्रधानांच्या संग्रहात 10 हजार पुस्तकं; या मराठी लेखकाचे नरेंद्र मोदी चाहते
अर्जाची प्रक्रिया
ऑन लाईन अर्ज भरताना स्कॅन केलेले उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही हवी.
Apply Online यावर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करता येईल.
अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारास सर्व तपशील योग्य प्रकारे भरावे लागतील.
या कार्यक्रमासाठी 500 रुपये फी online भरावी लागेल.
यशस्वीरीत्या अर्ज दाखल झाल्यानंतर अर्जाची soft copy निर्माण होईल.
अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ऑन लाईन लेखी परीक्षेसंदर्भात ई-मेल वा एसएमएसद्वारे कळवलं जाईल.
निवडचाचणीचे 2 प्रकार
पहिल्यात आॅनलाइन परीक्षा आणि उमेदवाराची निवड
प्रकार दुसरा
१. दिलेल्या विषयांवर संक्षिप्त टिपण
२. ग्रुप डिस्कशन
३. निवडलेल्या अर्जदारांची वैयक्तिक मुलाखत
४. अंतिम निवड जाहीर करणं
निवड झालेल्या उमेदवारांना शासनाचे विविध विभाग, मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिवांचं कार्यालय, विविध विभाग प्रमुखांची कार्यालयं किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून काम करण्याची संधी मिळेल.
ऑनलाईन लेखी परीक्षेच्या एकत्रित गुणांच्या आधारे २०० उमेदवारांना मुलाखत आणि गटचर्चेसाठी बोलावलं जाईल. एकत्रित गुणांच्या आधारे शेवटी ५० फेलो निवडण्यात येतील.
फेलोशिप कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व उमदेवारांना सर्टीफिकेट दिली जातील. अधिक माहितीसाठी http://mahades.maharashtra.gov.in इथे संपर्क करा.
SPECIAL REPORT: ड्रोनच्या अनोख्या करामती; आकाशात दिव्यांचा भव्य देखावा