नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री झाले भावुक

नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट  प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री झाले भावुक

नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

  • Share this:

नागपूर, 13 आॅगस्ट : नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट  प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

मुख्यमंत्री या प्रकल्पाच्या उद्घाटनादरम्यान भावुक झाले. वडिलांच्या कॅन्सरच्या लढाईचा काळ आठवत त्यांनी नातेवाईकांची झालेली परवड सांगितली.कॅन्सरच्या रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकांची उपचारादरम्यान काय अवस्था असते याची जाणीव वडिलांच्या कॅन्सरवेळी झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

नागपुरातल्या आबाजी थत्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन सोहळ्यात ते बोलत होते. गेले बावीस वर्ष कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या निर्मितीचं स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलसाठी 17 एकर जमीन एक रुपया लीजवर देणार असल्याचं जाहीर केलं.

First published: August 13, 2017, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading