Home /News /maharashtra /

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं घर अति महत्त्वाचे ठिकाण जाहीर, पोलिसांचा घराला पहारा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं घर अति महत्त्वाचे ठिकाण जाहीर, पोलिसांचा घराला पहारा!

   बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात केले जाणार आहे. विशेष बॅरेगेटींग करुन सर्व एन्ट्री पाँईंट बंद केले जाणार आहे.

बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात केले जाणार आहे. विशेष बॅरेगेटींग करुन सर्व एन्ट्री पाँईंट बंद केले जाणार आहे.

बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात केले जाणार आहे. विशेष बॅरेगेटींग करुन सर्व एन्ट्री पाँईंट बंद केले जाणार आहे.

ठाणे, 02 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी पदभार स्विकारल्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानावर आता अधिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान अति महत्वाचे ठिकाण म्हणून घोषित केले आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद गाठले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे हे कामाला लागले आहे. अजूनही एकनाथ शिंदे हे गोव्यातच  आहे. बंडखोर आमदारांची बैठक घेण्यात आली आहे. त्यानंतर सर्व आमदारांना घेऊन ते मुंबई पोहोचणार आहे. (शिंदेंना नेतेपदावरुन काढणं आक्षेपार्ह; शिवसेनेच्या पत्राला केसरकरांचं उत्तर) तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या सुरक्षेचा घेतला आढावा घेण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्त आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान अति महत्वाचे ठिकाण म्हणून घोषित केले आहे. बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात केले जाणार आहे. विशेष बॅरेगेटींग करुन सर्व एन्ट्री पाँईंट बंद केले जाणार आहे.  येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवली जाणार आहे. (Devshayani Ekadashi 2022 :10 जुलैला आहे देवशयनी एकादशी; जाणून घ्या महत्त्व) विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेवून काही तास उलटलेच तोच त्यांनी कामाचा धडाका लावला असून आक्रमकपणे सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी कामाला लावले असून त्यांचा हा आक्रमकपणा पाहून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेची पळापळ झाली आहे. मुख्यमंत्री निवास स्थानाभोवती परीसराचा भर पावसात डागडुजी करण्यात असून पावसाची उघडीप मिळाली की लगेच फुटपाथ बनवला जातोय. मेट्रो रेल्वे कामाचे पडलेले सामान उचललं जात आहे. तर पावसात सिमेंट कॅान्क्रिंटचे रोड बनवले जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Maharashtra News

पुढील बातम्या