मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

CM Eknath Shinde in Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर पूरग्रस्तांना न्याय मिळणार का?

CM Eknath Shinde in Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर पूरग्रस्तांना न्याय मिळणार का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ते पूर परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे. (CM Eknath Shinde in Kolhapur)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ते पूर परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे. (CM Eknath Shinde in Kolhapur)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ते पूर परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे. (CM Eknath Shinde in Kolhapur)

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 12 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ते पूर परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे. (CM Eknath Shinde in Kolhapur) दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून पूर परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील पूर बाधीत गावांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान जिल्ह्यात पाण्याखाली गेलेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि.13) सकाळी 11.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे येणार आहेत. त्यानंतर ते पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थीतीचा आढावा घेणार आहेत. याचबरोबर सांगली जिल्ह्यातील विट्याचे आमदार अनिल बाबर यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. आमदार बाबर यांच्या पत्निचे मागच्या आठवड्यात निधन झाल्याने ते त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 'बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’, शिवसेनेचं मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र

मुख्यमंत्री शिंदे तेथुन दुपारी 3 ते 3.30 वा कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा  घेणार आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातमध्ये त्यांनी 3.30 ते 4 ही वेळ राखून ठेवली आहे. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून विमानतळाकडे जाऊन मुंबईकडे जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या चार दिवसांपूर्वी पूरग्रस्ताना मदत जाहीर करण्यात आली होती.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत पोहोचण्यास आणखी किमान महिना लागणार आहे. मदतीबाबतचा शासनादेश (जीआर) निघण्यास १५ ते २० दिवस लागू शकतात. त्यानंतर पुढील १५ दिवसांनी प्रत्यक्षात मदत वाटप होऊ शकेल, अशी शक्यता मदत व पुनर्वसन विभागातील एका उच्च अधिकाऱ्याने व्यक्त केली.

हे ही वाचा : फडणवीस मुख्यमंत्री असते तर..., जयंत पाटलांचा शिंदेंना टोला

राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टी झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार झालेल्या पावसामुळे राज्यातील १५ लाख १० हजार हेक्टरवरील शेती पिकाचे होती.

मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) मदतीपेक्षा दुप्पट मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी मदतीचे निकष दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आले आहेत. आतापर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सन २०१५ च्या जुन्या निकषानुसार मदत वाटप केले जात होती.

First published:

Tags: Eknath Shinde, Kolhapur, Rain flood, Rain in kolhapur

पुढील बातम्या