Home /News /maharashtra /

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडली दुर्देवी घटना, एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना झापलं

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडली दुर्देवी घटना, एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना झापलं

ठाण्यात घोडबंदर रोडवरील काजूपाडा येथे खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. पावसाळ्यातली राज्यातली ही पहिली घटना ठरली

ठाण्यात घोडबंदर रोडवरील काजूपाडा येथे खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. पावसाळ्यातली राज्यातली ही पहिली घटना ठरली

ठाण्यात घोडबंदर रोडवरील काजूपाडा येथे खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. पावसाळ्यातली राज्यातली ही पहिली घटना ठरली

ठाणे, 06 जुलै :  ठाण्यात (thane ghodbunder road) घोडबंदररोडवरील काजूपाडा येथे खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारतच चांगलीच झाडाझडती घेतली. तसंच रस्ते दुरस्तीचे तातडीने आदेशही दिले. राज्यात पावसाने सर्वत्र जोर धरला आहे आणि या पावसाने रस्त्यांना खड्डे पडू लागले आहे.  ठाण्यात घोडबंदर रोडवरील काजूपाडा येथे खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. पावसाळ्यातली राज्यातली ही पहिली घटना ठरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना तातडीने बैठकीला बोलावले. ('एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा सरस ठरतील', बंडखोर आमदाराने शिवसेनेला डिवचलं) खड्डयात पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.  अशी घटना परत घडल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी बजावले. तसंच, तात्काळ रस्त्यांची डागडुजी करा आणि मृत मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क करुन योग्य ती मदत देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.  मिरा भाईंदर आणि ठाणे पोलीस आयुक्तालयालाही मुख्यमंत्र्यांनी आदेश आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश - अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर काम करण्याच्या सूचना द्या. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम केल्यास चांगल्याप्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते. - खड्डे लक्षपूर्वक भरा. खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणी जखमी होऊ नये याची दक्षता घ्या. कोल्ड मिक्स पद्धतीने खड्डे भरा. रस्ते दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणानी याबाबत काळजी घ्यावी. - पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून रहा. पूर येणाऱ्या भागात जिवीतहानी होऊ नये याची दक्षता घ्या. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी ठेवा आणि आवश्यकता पडल्यास वेळेत हलवा. - दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागातील लोकांना सावध रहाण्याची सूचना द्या. सुरक्षित स्थळी लोकांची जी व्यवस्था करायची ती चांगलीच करा. राहण्याची - जेवणाची चांगली व्यवस्था करा. काय आहे प्रकरण? ठाण्यातील  घोडबंदर रोड हा मृत्यूचा सापळा बनला आहे.   घोडबंदररोडवरील काजूपाडा येथे खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. काजुपाडा येथील रोडवर गेल्या ३ दिवसात झालेत २२ अपघात  झाले आहे. मोहसीन अहमद इरफान खान (वय ३७ ) असं तरुणाचं नाव आहे. पेशाने इलेक्ट्रीशन असलेला मोहसीन उराशी स्वप्न बाळगून आयुष्यात खुप मोठं होण्यासाठी ठाण्यातील मुंब्रा येथे आला होता. मुंब्र्यात तो त्याच्या मित्रांसोबत राहत होता. (Video शिंदे- भाजप सरकार येताच, भास्कर जाधव लागले शेतीच्या कामाला) ६ जुलैला कामानिमित्त मिरा भायंदर येथे ठाण्याहून घोडबंदर मार्गे जात होता. जोरदार पाऊस पडत होता आणि त्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले होते. एक एक खड्डा चुकवत मोहसीन पुढे जात होता पण काजुपाडा येथे येताच रस्तावर पाणी भरले होते असा अंदाज घेवून मोहसीन गाडी चालवत होता आणि अचानक एका ३ फूट खड्ड्यात त्याची गाडी आदळली आणि मोहसीन खाली पडला तोच मागून येणारी एसटी बस त्याच्या डोक्यावरुन गेली आणि खड्ड्यामुळे मोहसीनचा बळी गेला. मोहसीन सारखेच राजेश पांचाळ या तरुणाचा ही असाच अपघात झाला होता पण सुदैवाने त्याच्या मागून कोणती गाडी नव्हती म्हणून राजेशचा जीव वाचला. ('एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा सरस ठरतील', बंडखोर आमदाराने शिवसेनेला डिवचलं) ज्या वेळेस मोहसिनचा अपघात झाला त्याच्या काही मिनिटानंतरच आणखी एक तरुण याच काजुपाडा येथील खड्डायत दुचाकीसह पडला त्यांच्या हाताला, पायाला आणि पाठीला मार लागला. त्याचे हेल्मेट सुद्धा तुटले तर गाडी खड्ड्यात एवढ्या जोरात आदळली होती की त्याच्या गाडीची हेडलाईट फुटली. ठाण्याहून घोडबंदर मार्गे मोठ्या प्रमाणात अनेकजण कामा निम्मित प्रवास करतात. मोहसीन आणि राजेश सारखे अनेकजण आहेत जे येथून प्रवास करताना जखमी झाले. पण मोहसीनचा बळी जाईपर्यंत प्रशासन झोपले होते.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या