दिल्ली, 27 मे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते निती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. निती आयोगाची ही महत्त्वपूर्ण बैठक आहे. निती आयोगाच्या या बैठकीवर बहिष्कार टाकने योग्य नाही. विरोधकांना जी पोटदुखी सुटली आहे, त्याचा इलाज जनता जमालगोटा देऊन करेल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
निती आयोगाच्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीला मी जात आहे. राज्यात अनेक विकासाचे प्रश्न आहेत. महिलांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आजच्या या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. निती आयोगाची ही बैठक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीवर कोणी बहिष्कार टाकत असेल तर ते योग्य नाही. गेल्या दहा महिन्यांत आम्हाला विकासासाठी मोठी साथ मिळाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
Breaking news : राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत घडामोडींना वेग; राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय!
दरम्यान त्यांनी यावेळी नव्या संसदेच्या उद्घाटनावरूनही विरोधकांवर निशाणा साधला. नवीन संसद हे अतिशय रेकॉर्ड वेळेमध्ये पूर्ण झाले आहे. 2019 मध्ये सुरुवात झाली आणि 2023 मध्ये या वास्तूचे लोकापर्ण होत आहे. ही संपूर्ण देश आणि जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. त्यामुळे संसदेच्या लोकार्पणप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. मात्र काही लोकांकडून विरोध केला जात आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. विरोधक नेमकं लोकशाहीला विरोध करत आहेत की मोदींना? विरोधकांना जी पोटदुखी सुटली आहे, त्याचा इला आता जनताच जमालगोटा देवून करेल असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Shiv sena