शिवसेनेच्या तातडीच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा, मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना

शिवसेनेच्या तातडीच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा, मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना

राज्यात कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंची ही आढावा बैठक असल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर या बैठकीचं आयोजन केलं होतं. काही मंत्री ऑनलाईन तर काही वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. या खास बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा केली गेली. राज्यात कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंची ही आढावा बैठक असल्याची माहिती समोर येत आहे.

वर्षा बंगल्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल परब, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराजे देसाई, हे मंत्री उपस्थित होते तर इतर मंत्री व्हिडीयो काँनफरसिंगच्या माध्यामातून उपस्थित होते. कोरोनाच्या काळात पुढील उपाययोजना करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू असल्यामुळे शिवसेनेचे मंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये काय उपाययोजना करत आहेत. तसेच त्यांच्या मंत्रालयातील कामकाजा संदर्भात आढावा घेण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात कोरोना परीस्थितीत पुढील काळात अत्यावश्यक उपाययोजनांसंदर्भातही महत्वाची चर्चा केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

राज्यभरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागवार चर्चा करण्यात आली. यामध्ये लोकहिताचे प्रकल्प हाती घेण्यावर भर देण्यात आला. आघाडीमध्ये पुन्हा पारनेर सारखी घटना होऊ नये यासाठी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. परिक्षेसंदर्भात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली.

संपादन - रेणुका धायबर

Published by: Manoj Khandekar
First published: July 9, 2020, 4:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading