अंगणवाडी सेविकांना मेस्मा लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती

अंगणवाडी सेविकांना मेस्मा लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती

स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा आज विधानसभेत केली. शिवसेनेच्या दबावापुढे सरकार झुकलं, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

  • Share this:

22 मार्च : अंगणवाडी सेविकांना मेस्माअंतर्गत आणण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं स्थगिती दिलीये.स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा आज विधानसभेत केली. शिवसेनेच्या दबावापुढे सरकार झुकलं, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

अंगणवाडी सेविकांनी संपावर जाऊ नये, किंबहुना त्यांना जाता येऊ नये, यासाठी सरकारनं हा कठोर निर्णय घेतला होता. पण सहाजिकच तो अंगणवाडी सेविकांना मान्य नव्हता. विधेयक मंजूर होताना शिवसेनेनं काहीच विरोध केला नव्हता, नंतर मात्र सेनेला पश्चातबुद्धी सुचली, अशी टीका झाली.

अंगणवाडी सेविकांना लागू केलेला मेस्मा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना सदस्य काल आक्रमक झाले होते.  त्यामुळे सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविका निवृत्तीचं वय 60 वरून 65 करावं या कारणासाठी संपावर गेल्या होत्या. सरकारनेही अंगणवाडी सेविकांची मागणी अखेर मान्य केली पण संप काळात त्यांच्यावर मेस्मा कायदा लागू करण्यात आला. या कायद्याअंतर्गत अंगणवाडी सेविका संपावर गेल्या म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात तसंच प्रसंगी त्यांना अटकही होऊ शकते. इतकंच नाही तर संपाच्या दिवसातील कामाची भरपाईही त्यांना दिली जाणार नाही.

अत्यंत तोकड्या पगारावर काम करणाऱ्या, खेडोपाडी प्रसंगी महिलांना प्रसुतीत मदत करणाऱ्या या महिलांवर मेस्मा लावणं अन्याय्य आहे अशी शिवसेना आणि इतर विरोधी पक्षांची भूमिका होती.

याचसाठी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेनेही हा कायदा काढण्याची मागणी लावून धरली. तसंच ते आक्रमक झाल्यामुळे विधानसभेत गदारोळ झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2018 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading