राज्यात आणखी एका जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, हजारो कोंबड्या करणार नष्ट

राज्यात आणखी एका जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, हजारो कोंबड्या करणार नष्ट

मंगळवेढा तालुक्यात कोंबड्यांची वाहतूक, विक्री, बाजार, जत्रा, प्रदर्शनाला प्रतिबंध घालण्यात आले आहे.

  • Share this:

पंढरपूर, 17 जानेवारी : कोरोना (Corona) संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे  (Maharashtra) आता बर्ड फ्लूचे (bird flu)संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. दररोज नव्या जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा (Mangalwedha ) तालुक्यातही बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गावात काही दिवसांपूर्वी कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. कोंबड्यांच्या स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. आज याबद्दलचा अहवाल समोर आला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जंगलगी गावातील परिसरापासून एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहे. शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्तपद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे.

गाडीला धडक दिली म्हणून चापट मारली, महेश मांजरेकरांचा VIDEO व्हायरल

मंगळवेढा तालुक्यात कोंबड्यांची वाहतूक, विक्री, बाजार, जत्रा, प्रदर्शनाला प्रतिबंध घालण्यात आले आहे.  जंगलगी, जंगलगी वस्ती, सलगर बुद्रुक, सलगर खुद्र, आसबेवाडी, लवंगी, बावची, चिक्कलगी, शिवणगी ही सर्व गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेश होईपर्यंत घोषित करण्यात आली आहे, अशी माहिती मिलिंद शंभरकर यांनी दिली.

शॅडो बँकांमधील गैरव्यवहारांचे प्रमाण वाढत असल्यानं रिझर्व्ह बँकेने उचललं पाऊल

तसंच, जगलगी परिसरातील कोंबड्या विक्री, वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. जंगलगीपासून पाच किलोमिटर परिसरातील जिवंत वा मृत पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य, अनुषंगिक साहित्य उपकरणे वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.

याआधी राज्यातील बीड, परभणी, दापोली, दौंड, मुंबई आणि ठाण्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्या आणि पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Published by: sachin Salve
First published: January 17, 2021, 8:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या