'अवनी'चे २ बछडे सापडले पण....

'अवनी'चे २ बछडे सापडले पण....

वाघ्रप्रेमींच्या दृष्टीने विदर्भातून एक चांगली आणि एक वाईट बातमी. वनविभागाने गोळ्या घातलेल्या अवनी वाघिणीच्या दोन बछड्यांचा शोध लागलाय, पण नेमकं आजच चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली जंगलात ३ बछडे रेल्वे मार्गावर मृतावस्थेत आढळले.

  • Share this:

प्रविण मुधोळकर, नागपूर, 15 नोव्हेंबर - वनविभागाने गोळ्या घातलेल्या अवनी वाघिणीच्या दोन बछड्यांचा शोध लागलाय. तर चंद्रपुर जिल्ह्यातील चिचपल्ली जंगालातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर वाघांच्या तीन बछडे मृतावस्थेत आढळले आहे. रेल्वे मार्गावर मृतावस्थेत आढळलेल्या बछड्यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असल्याची माहीती असून, त्यांचा मृत्यू रेल्वेची धडक लागल्याने झाला? की त्यामागे आणखी काही कारण आहे? याचा तपास आता वनविभागाकडून करण्यात येत आहे.

चंद्रपुरहुन गोंदियापर्यंत जाणारा हा रेल्वेमार्ग घनदाट जंगलातून जातो. या रेल्वेमार्गावर यापुर्वीसुद्धा अनेकदा अशाप्रकारच्या घटना घडल्या असून, त्यात अनेक वन्यजीवांनी आपला जीव गमावलाय. चिचपल्ली जंगलातून जाणाऱ्या या रेल्वे मार्गावर सुरुवातीला दोन बछडे मृतावस्थेत आढळल्याची माहिती होती. पण, त्यानंतर सुरू झालेल्या शोधकार्यादरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणखी एक बछडा रेल्वे मार्गाच्या कडेला जरा दूरवर मृतावस्थेत पडलेला आढळून आला.

प्रथमदर्शनी या तिन्ही बछड्यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असल्याची माहिती समोर येतेय. पण, या तिन्ही छाव्यांचा मृत्यू रेल्वेची धडक बसल्यामुळे झाला? की त्यामागे आणखी काही कारण आहे? याचा तपास आता वनविभागाकडून करण्यात येत आहे.

या रेल्वे मार्गावर यापूर्वीसुद्धा गाडीची धडक बसल्याने अनेक वन्यजीवांचा मृत्यू झाल्याच घटना घडल्या आहेत. गुरुवारी 'एफडीसीएम'च्या कंपार्टमेंट क्रमांक 410 मध्ये ही घटना घडल्याची माहिती चंद्रपुर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रामाराव एस. वी. यांनी न्यूज18 लोकमतला दिली. यापूर्वी 2013 आणि 2015 मध्ये याच परिसरात आणि अशाच पद्धतीने वाघांचे बछडे मृतावस्थेत आढळून आले होते.

एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल

First published: November 15, 2018, 6:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading