मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी! इंद्रावती नदीमध्ये बुडाली बोट, काही लोक बुडाल्याची शक्यता

मोठी बातमी! इंद्रावती नदीमध्ये बुडाली बोट, काही लोक बुडाल्याची शक्यता

दोन लहान नाव घेऊन काही लोक छत्तीगडमधील कार्यक्रमाला जात असताना ही दुर्घटना घडली आहे.

दोन लहान नाव घेऊन काही लोक छत्तीगडमधील कार्यक्रमाला जात असताना ही दुर्घटना घडली आहे.

दोन लहान नाव घेऊन काही लोक छत्तीगडमधील कार्यक्रमाला जात असताना ही दुर्घटना घडली आहे.

गडचिरोली, 21 ऑक्टोबर : गडचिरली जिल्ह्यातील इंद्रवती नदीमध्ये नाव बुडाल्यानं मोठी दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेतून 13 जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर काही जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. सिरोंचा तालुक्यात सोमनपल्ली भागातून छत्तीसगड इथे एका कार्यक्रमासाठी दोन नाव घेऊन काही जण निघाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही नाव संध्याकाळी 7 च्या सुमारास छत्तीसगड इथला कार्यक्रम करून पुन्हा येत असताना मंगळवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे. दोन जण सुरुवातीला बाहेर पण तर या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. 13 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे तर आणखीन तीन नागरिक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. वन विभाग, ग्रामस्थ आणि पोलिसांकडून बेपत्ता असणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

हे वाचा-मुंबईजवळच्या शहरात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, महिलांचाही समावेश; पाहा VIDEO

दोन लहान नाव घेऊन काही लोक छत्तीगडमधील कार्यक्रमाला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. नेमकी नाव कशामुळे उलटली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. नाव उलटल्यानंतर सुरुवाती दोन जण सुरक्षित बाहेर पडले तर तीन जण नदीमध्ये असलेल्या दगडाला घट्ट धरून बचावासाठी ओरडत होते. रात्री उशिरा वन विभागाच्या टीमने बोटीच्या मदतीनं काही जणांना इंद्रावती नदीच्या पाण्यातून बाहेर काढलं आहे. अद्यापही पोलीस आणि वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

First published:

Tags: Chattisgarh, Gadchiroli