Home /News /maharashtra /

Amravati: आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपाने हटवला

Amravati: आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपाने हटवला

आमदार रवी राणा यांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिकेने हटवला आहे. पोलीस बंदोबस्तात पहाटेच्या सुमारास हा पुतळा हटवण्यात आला आहे.

अमरावती, 16 जानेवारी : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj statue) बसवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आता महानगरपालिकने (Municipal Corporation) हटवला आहे. आमदार रवी राणा यांनी विना परवानगी शिवरायांचा हा पुतळा बसविला होता. विनापरवानगीने राजापेठ येथील उड्डाणपुलावर (Rajapeth flyover) शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. काल रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आणि त्यानंतर हा पुतळा हटविण्यात आला. हा पुतळा महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने काढला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती. पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यात शिव प्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याचे समजते. दरम्यान यात मनसेने देखील उडी घेतली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा सत्कार करून राणा दाम्पत्याचे आभार मानले होते. तर मनसेने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून महाआरती करून महाराजांना मानाचा मुजरा, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांना सुद्धा दिल्या होत्या. दरम्यान या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण पेटले मात्र अद्यापही याला मनपाने परवानगी दिलेली नाही. आता अमरावती राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने हटवला आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा पुतळा हटवण्यात आला आहे. अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर तसेच राणा दाम्पत्याच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर राणा समर्थक आणि मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Amravati, Chhatrapati shivaji maharaj, Ravi rana

पुढील बातम्या