छत्रपती शिवाजी महाराजांवर आणखी एक वादग्रस्त पुस्तक; आक्षेपार्ह मजकुरामुळे भाजपने केली बंदीची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांवर आणखी एक वादग्रस्त पुस्तक; आक्षेपार्ह मजकुरामुळे भाजपने केली बंदीची मागणी

अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एका पुस्तकातून अवमानजनक मजकूर लिहिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. शिवजयंतीला काही दिवस असताना हा वाद उफाळून आला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एका पुस्तकातून अवमानजनक मजकूर लिहिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. 'शिवाजीचं उदात्तीकरण पडद्यावरचे वास्तव' नावाच्या या पुस्तकावर तातडीने बंदी आणावी. लेखक आणि प्रकाशकांना अटक करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

मध्य प्रदेशात छिंदवाडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुल्डोजरने हटवल्याचा वाद ताजा असताना आणखी एकदा महाराजांचा अवमान झाल्याचं भाजपने म्हटलं आहे. मूळचे नागपूरचे असणारे लेखक डॉ. विनोद अनाव्रत यांनी 'शिवाजीचं उदात्तीकरण पडद्यावरचे वास्तव' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक दर्जाहीन आणि अवमानजनक असल्याचा दावा भाजपतर्फे शिवराय कुलकर्णी यांनी केला.

शिवाजी महाराजांचा मोठेपणा कमी करण्याच्या हेतूने हे पुस्तक लिहिलं गेल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला. भाजपचे प्रवक्ते असलेले शिवराय कुलकर्णी म्हणाले, "अत्यंत हीन दर्जाचं आणि अवमानजनक लेखन यात आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. म्हणून या प्रकाशकावर आणि लेखकावर गुन्हा नोंदवण्यात यावा. त्यांना अटक करण्यात यावं. अशी आमची मागणी आहे."  सुगावा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे, अशी माहितीही कुलकर्णी यांनी दिली.

--------------

अन्य बातम्या

न्यूक्लिअर हल्ला झाला तरी ट्रम्प यांना साधं खरचटणारही नाही, भारतात खास कार दाखल

'एखादा शब्द पकडणे चुकीचं...', बच्चू कडू यांच्याकडून इंदुरीकर महाराजांचे समर्थन

मोदी सरकार शोधणार औरंगजेबाच्या भावाची कबर, 7 सदस्यांच्या समितीची स्थापना

First published: February 17, 2020, 7:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या