मुंबई, 23 मे: आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) वर्षा बंगल्यावर जाणार नाही आहेत. संभाजीराजे शिवसेनाच काय तर कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाही. न्यूज 18 लोकमतला (News18 Lokmat) विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेणार होते. पण आता ही भेट होणार नसल्याचं समजतंय.
छत्रपती संभाजीराजे सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणूनच उमेदवारी करणार असल्याचं समजतंय. भाजपसह महाविकास आघाडीतील आमदारांचा संभाजीराजेंना पाठिंबा आहे. संभाजीराजे यांच्या विरोधात उमेदवार देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला शिवसेनेतल्या आमदारांनेच विरोध केला आहे.
निलेश राणेंचं नवं Tweet, थेट छत्रपती संभाजीराजेंना केलं आवाहन
संभाजीराजेंना विरोध राजकीय दृष्टा न परवडणारा असल्याने आमदारांचा पक्ष नेतृत्वाकडे विरोध न करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेंनी उमेदवारी करावी हा देखील पर्याय देण्यात आला आहे. संभाजीराजे यांच्याकडून मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आहे. त्यामुळे संभाजीराजे अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत.
आज मुख्यमंत्र्यांची होणार होती भेट
आज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेणार होते विधानसभा आमदारांमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करू असा पवित्रा शिवसेनेनं (Shiv Sena) घेतला. यानंतरच छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान संभाजीराजेंनी निमंत्रण स्वीकारलं होतं. पण आता संभाजीराजे वर्षावर जाणार नाही आहेत.
यामुळे खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.