सुशील राऊत,प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च : उच्चशिक्षण झाल्यावर काही दिवस नोकरी केल्यानंतर वाळूज भागामध्ये स्नॅक सेंटर सुरू केले. त्याच्या जोरावर रेस्टॉरंट ही चालवायला घेतलं. यामध्ये चांगला जमही बसला महिन्याकाठी लाखों रुपये कमवत होते. मात्र,अचानक लॉकडाऊन लागले. या काळात हा व्यवसाय बंद करावा लागला. तब्बल 7 लाखांचं नुकसान झालं. पण, खचून न जाता त्यांनी पुन्हा व्यवसायाला सुरूवात केली. आता ते पराठा हाऊसच्या माध्यमातून लाखों रुपयांची कमाई करतात. छत्रपती संभाजीनगरचे व्यावसायिक विशाल कश्यप यांची ही यशोगाथा आहे.
व्यवसाय बंद करावा लागला
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील डोणगावचे विशाल कश्यप. विशाल यांचे मामा छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात आणि मामाच्या घरी विशाल हे राहत होते. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण पूर्ण केलं. बीएपर्यंत पदवी पूर्ण झाल्यानंतर काही दिवस नोकरीही केली. पण नोकरीमध्ये मन रमत नसल्यामुळे त्यांनी नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच त्यांनी एमआयडीसी भागामध्ये 2015 मध्ये स्नॅक सेंटर सुरू केलं. यासाठी त्यांना 4 लाख रुपये खर्च आला.
स्नॅक्स सेंटरमध्ये जम बसल्यानंतर त्यांनी त्यांनी रेस्टॉरंट चालवायला घेतलं. या व्यवसायात त्यांना त्यांच्या पत्नी उज्वला यादेखील मदत करत होत्या. यातून त्यांना महिन्याला लाखों रुपये उत्पन्न मिळत होतं. व्यवसात जम बसवला. मात्र, कोरोना आला आणि लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद करावा लागला. यामध्ये 7 लाखांचं नुकसान झालं, असं विशाल कश्यप यांनी सांगितले.
...आणि सुरु केले पराठा हाऊस
दरम्यानच काळ त्यांच्यासाठी कठीण गेला. व्यवसायामध्ये 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्यामुळे विशाल हे काही दिवस तणावात होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे पुन्हा काहीतरी सुरू करावं असं त्यांनी त्यांच्या पत्नी उज्वला यांना बोलून दाखवलं. यासाठी उज्वला यांनी देखील होकार दिला आणि यातूनच त्यांनी शहरांमध्ये पराठा हाऊस सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी इतर पराठा हाऊस पेक्षा वेगळा काहीतरी देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले. जिजा पराठा हाऊस नावाने त्यांनी पराठा हाऊस सुरू केले. यासाठी त्यांना 4 लाख रुपये खर्च आला. पराठा हाऊसमध्ये त्यांनी 4 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी पराठा हाऊसमध्ये 125 प्रकारचे पराठे ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यामधून ते लाखों रुपयांची कमाई करतात.
चिकन शोरमा खावा तर इथंच! पाहा कशी तयार होते औरंगाबादची फेमस डिश, Video
कोणते मिळतात पराठे?
संपूर्ण भाज्यांचे पराठे, डायट पराठा, स्वीट पराठा, उपवास थालीपीठ, मेक्सिकन पराठा, पिझ्झा पराठा, इटालियन पराठा असे वेगवेगळे पराठा मिळतात.
व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला
उच्च शिक्षण झाल्यानंतर काही दिवस नोकरी केली. पण नोकरीमध्ये मन रमत नव्हते. यामुळे मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. माझा व्यवसाय सुरू केला. यात चांगला जमही बसला. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. यामुळे व्यवसाय बंद करावा लागला आणि यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, पुन्हा व्यवसाय सुरू केला आणि आता यामधून चांगले उत्पन्न मिळत आहे, असं जिजा पराठ्याचे मालक विशाल कश्यप यांनी सांगितलं.
ग्राहकांचा प्रतिसाद चांगला
जिजा पराठा हाऊसमध्ये 125 प्रकारचे पराठे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मिळत असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. भविष्यामध्ये जिजा पराठा हाऊस वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं उज्वला कश्यप सांगितले.
कुठे आहे पराठा हाऊस?
शॉप नंबर तीन निकिता अपार्टमेंट एचडीएफसी बँकच्या पाठीमागे छत्रपती संभाजीनगर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.