मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मविआ'ची वज्रमुठ विरोधकांवर आदळणार; छ. संभाजीनगरातील सभेकडं राज्याचं लक्ष!

'मविआ'ची वज्रमुठ विरोधकांवर आदळणार; छ. संभाजीनगरातील सभेकडं राज्याचं लक्ष!

आज छत्रपती संभाजीनगरात 'मविआ'ची सभा

आज छत्रपती संभाजीनगरात 'मविआ'ची सभा

छत्रपती संभाजीनगरात आज होणारी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

छत्रपती संभाजीनगर, 2 एप्रिल :  आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासह इतर प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या सभेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.

 सरकारच्या कोंडीचा प्रयत्न  

छत्रपती संभाजीनगरात आज होणारी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांकडून सरकारची कोंडी केली जाऊ शकते. राहुल गांधी यांच्या खासदारकीचा मुद्दा, अतिवृष्टीमध्ये झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान अशा काही प्रश्नांवरून विरोधक या सभेत सरकारवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी आज शिंदे-फडणवीस सरकारकडून सावरकर गौरव यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले नाना पटोले? 

छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही भाजपविरोधात सभा घेत आहोत. तीनही पक्षाची भूमिका हीच आहे की, भाजपला सत्तेतून बाहेर काढायचे. आमचे विचार जरी वेगळे असले तरी मात्र भूमिका एकच आहे. ते सावरकर स्मारक बांधणार असतील तर काही फरक पडत नाही. आम्ही पुढच्या महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज , ज्योतिबा फुले यांच्या सन्मानार्थ यात्रा काढणार असल्याची माहिती या सभेबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Congress, Nana Patole, NCP, Shiv sena, Uddhav Thackeray