अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर, 19 मे : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये पती पत्नीसह त्यांच्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या वळदगावमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. पाच वर्षांच्या चिमुकलीसह पती पत्नीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, य़ा घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्या की घातपात याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
छत्रपती संभाजी नगर शहरातील वाळूज औद्योगिक परिसरातील वळदगाव येथे मोहन प्रताप डांगर हा पत्नी पूजा आणि पाच वर्षांची मुलगी श्रेया यांच्यासोबत राहत होता. तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेविषयी शहरातील सातारा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आत्महत्या असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.
First published:
top videos
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.