मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिरसाटांची जीभ पुन्हा घसरली; राऊतांना नको ते बोलले, म्हणाले हा माणूस रेड्याचं..

शिरसाटांची जीभ पुन्हा घसरली; राऊतांना नको ते बोलले, म्हणाले हा माणूस रेड्याचं..

शिससाट यांची राऊतांवर टीका

शिससाट यांची राऊतांवर टीका

पुन्हा एकदा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते खासदास संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

छत्रपती संभाजीनगर, 2 एप्रिल, अविनाश कानडजे :  आज छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर दुसरीकडे शिंदे, फडणवीस सरकारच्या वतीनं सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून संभाजीनगरचं राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे. पुन्हा एकदा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते खासदास संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांवर टीका करताना पुन्हा शिरसाट यांची जीभ घसरल्यचां पहायला मिळालं.

 नेमकं काय म्हणाले शिरसाट? 

'संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'आम्ही सावरकरांचे साहित्य वाचलं नाही, सावरकर आत्मसात केलेले आहेत. सावरकरांचे साहित्य वाचणाऱ्यांना वाचलेलं बोलावं लागतं. संजय राऊत सारखा बडबबड कणाऱ्या मूर्ख माणसाला हेच उत्तर बरोबर आहे. संजय राऊत डोक्यावर पडलेला माणूस आहे. त्याला जास्त महत्त्व देऊ नका. रेड्याचं दूध काढणारा हा माणूस आहे, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे'.

आज मविआची सभा 

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा आहे. या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटलो यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

First published:
top videos

    Tags: Sanjay raut, Shiv sena